Blood Donation Camp | शहीद टिपू सुलतान जयंती दिनी रक्तदान शिबिर
रक्तदान हे जीवदान आहे – युवा उद्योजक इलियास शेख
सोलापूर दिनांक 21 नोव्हेंबर
हिंद बहुउद्देशीय सामाजिक संस्था व 313 सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद टिपू सुलतान यांच्या जयंती दिनाचे औचित्य सादत सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर रोजी विजापूर रोड येथील इंदिरानगर बेगर हाऊसिंग सोसायटी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं.
परिसरातील ज्येष्ठ नागरिक सलीम मुर्गीवाले , दाऊद काझी व युवा उद्योजक इलियास शेख या मान्यवरांच्या हस्ते फित कापून भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आलं.
याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना इलियास शेख म्हणाले आपल्या आयुष्यात प्रत्येकाने रक्तदान करून पुण्य पदरात पाडून घेतलं पाहिजे कारण रक्तदान हे जीवदान आहे. प्रत्येक सणासुदीच्या दिवसात रक्तदान शिबिर भरवलंच पाहिजे, त्यामुळे शहर जिल्ह्यातील रक्तपेढीमध्ये रक्ताची कमतरता जाणवणार नाही. याचा फायदा गोरगरीब गरजू रुग्णांना होणार आहे. परिसरातील तरुणांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
याप्रसंगी हिंद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष वसीम शेख, 313 ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष इरफान शेख ,ज्येष्ठ समाजसेवक महेश मस्के, मुसा आत्तार, वसीम बंदाल, इलाई शेख, शौकत अत्तार, पप्पू पठाण ,अहमद मुल्ला ,सिद्धार्थ गायकवाड, संतोष नगरकर, अप्पू बोसनुरे आदी परिसरातील शेकडो नागरिक या ठिकाणी उपस्थित होते.