BSNL SIM card distribution on the occasion of Shahu Maharaj Jayanti
आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंती दिनानिमित्त मोफत बीएसएनएल सिम कार्ड चे वाटप
सोलापूर दिनांक 27 [ संपादक Sachinkumar Jadhav]
२६ जून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील संजय नगर कुमठा नाका युवा मंच यांच्या वतीने बीएसएनएल चे सिम कार्ड मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी परिसरातील बहुसंख्या नागरिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेतला. मोफत सिम कार्ड मिळाल्यामुळे लाभार्थ्यांनी युवा मंच संस्थेचे धर्मेंद्र चंदनशिवे यांचे आभार मानले.
प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते आरक्षणाचे जनक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.याप्रसंगी अशोक सोनकवडे, मेजर शिखरे कमांडो संजय झळके, अविनाश वाघमारे, सुनील साबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक धर्मेंद्र चंदनशिवे यांनी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर सोनकवडे अमित चंदनशिवे रोहन निकंबे अनिल भिसे लक्ष्मण गायकवाड व्यापारी चंद्रशेखर भोसले मामा मनोज मस्के विक्रम दळवी अनिकेत चंदनशिवे स्वप्निल वाघमारे रोहन कांबळे उमेश लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .
युवा मंचच्या वतीने अनेक लोकाभिमुख कार्यक्रम आत्तापर्यंत राबवत आलो आहोत आणि इथून पुढेही राबवणार आहोत असे आश्वासन युवा मंचचे धर्मेंद्र चंदनशिवे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.