Buddha Purnima was celebrated in the country and abroad
संपादक :- Sachinkumar Jadhav
India [Maharashtra] Dated 28 May
वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा या दिवशी बुद्ध जयंती जगभरात साजरी केली जाते. बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा व मोठा सण व उत्सव आहे. सण जगभरात विशेषतः वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण झाले. या तीनही महत्त्वाच्या घटना एकाच दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडले आहेत. विज्ञानवादी व मानवतावादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जागतिक महापुरुष व गुरू मानले जाते. बौद्ध धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण मोठ्या आनंदोत्सवात साजरा करतात.
INDIA
भारत देशामध्ये सर्वप्रथम बुद्ध जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी साजरी केली. सन 1951 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तीन दिवसीय बौद्ध जयंती महोत्सव साजरा केला होता. भारत देशात बौद्ध जयंतीचे कार्यक्रम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे सुरू झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्रासह भारत देशात विविध ठिकाणी कानाकोपऱ्यात वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध जयंती मोठ्या अनंदोत्सवांने साजरी केली जाते.
महाराष्ट्र राज्य
सोलापूर शहरातील संजय नगर कुमठा नाका येथील युवा मंचाच्या वतीने बौद्ध जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्प व पुष्पहार वाहून सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तथागत गौतम बुद्धांचे विचार व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे मानव जातीसाठी किती महत्त्वाचे ठरत आहेत यावर चर्चा करण्यात आली. परिसरातील नागरिकांना प्रसाद म्हणून लाडूचे वाटप करण्यात आले. सोलापूर शहरात अनेक ठिकाणी विविध सामाजिक संस्था सामाजिक संघटना यांच्या वतीने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. व प्रसाद म्हणून गौतम बुद्ध यांना आवडणारी गव्हाची खीर वाटप करण्यात आली.
Om mani padme hum
ॐ मणि पद्मे हूँ
India [Maharashtra] Dated 28 May
Buddha Jayanti is celebrated all over the world on Vaishakh Purnima or Buddha Purnima. It is the most important and biggest festival and celebration of Buddhists. Festivals around the world especially on the day of Vaishakh Purnima Tathagata Lord Gautama Buddha was born. He attained enlightenment on the day of Vaishakh Purnima. And on the full moon day of Vaishakh, Tathagata Gautama Buddha attained Mahaparinirvana. All these three important events have happened on the same day i.e. Vaishakh full moon day. The Tathagata Buddha is considered a world great man and guru because of his scientific and humanistic Dhamma doctrine. Buddhists from around 180 countries, including China, Japan, Vietnam, Thailand, India, Myanmar, Sri Lanka, Singapore, America, Cambodia, Malaysia, Nepal, Indonesia, which have a large number of Buddhists, celebrate this festival with great joy.
First Buddha Jayanti in India Babasaheb Ambedkar celebrated it. In the year 1951 Dr. Babasaheb Ambedkar celebrated the three-day Buddhist Jubilee Festival. Buddhist Jayanti programs in India are Dr. It was started because of Babasaheb Ambedkar.
Since then till today, Vaishakh Purnima i.e. Buddha Jayanti is celebrated with great joy in different parts of India including Maharashtra. The Buddhist Jubilee was celebrated by Yuva Mancha at Sanjay Nagar Kumtha Naka in Solapur city in the state of Maharashtra. At this place, mass Buddha worship was performed by offering flowers and wreaths to the statues of Tathagata Gautam Buddha and Dr. Babasaheb Ambedkar. Thoughts of Tathagata Gautama Buddha and Dr. It was discussed how important Babasaheb Ambedkar’s thoughts are for mankind. Ladoo was distributed as prasad to the residents of the area. Buddha Jayanti was celebrated on behalf of various social organizations and social organizations at many places in Solapur city. And as prasad, wheat pudding which Gautam Buddha liked was distributed.
Om mani padme hum