प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना, इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने Chandrayaan-3 मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सिद्धेश्वर मंदिरात भाजपच्या वतीने महाआरती करण्यात आली.
यावेळी भारत माता की जय, शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज की जय, हम होंगे कामयाब, मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है अशा घोषणा देण्यात आल्या आणि अशा घोषणाचे पोस्टर कार्यकर्ते व नागरिकांच्या हातात दिसत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व इस्रोच्या वैज्ञानिकांच्या परिश्रमाला यश मिळो, अटलजींची “कोशीश करणेवालो की कभी हार नहीं होती” ही कविता लिहिलेले पोस्टर सर्वांना आकर्षित करणारे होते. Chandrayaan-3
याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य हेमंत पिंगळे, माजी स्थायी समिती सभापती जगदीश पाटील, प्रा.गजानन धरणे,भाजयुमो प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने, मंडल अध्यक्ष महेश देवकर, नगरसेवक अमित पाटील, संपदा जोशी, अमर बिराजदार, यतीराज होनमाने, प्रभाकर पडवळकर व मोठ्या संख्यने सोलापूरकर नागरिक उपस्थित होते. Chandrayaan-3