Code of Conduct | आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी विविध बाबींवर निर्बंध
Solapur जिल्ह्यात कलम 144 लागू
सोलापूर दि.26 [ SachinkumarJadhav ]
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ नये तसेच आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदीनुसार निर्बंध लागू केले आहेत
सोलापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी वाहनाच्या ताफ्यात सलग 10 पेक्षा अधिक मोटार गाड्या व वाहने वापरण्यास निर्बंध राहतील. निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे, इत्यादी करीता कोणत्याही खाजगी व्यक्तीच्या जागा, इमारत, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाचे परवानगी शिवाय व संबंधीत परवाना देणाऱ्या स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रीया पुर्ण निर्बंध राहतील. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणीक संस्थाच्या जागेमध्ये, परिसरात लगत जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध राहतील. सदरचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कुमार आर्शीवाद यांनी निर्गमित केले आहेत.