Collector’s instructions to journalists regarding the counting area

मतमोजणी कक्ष
मतमोजणी कक्ष

Collector’s instructions to journalists regarding the counting area

मतमोजणी परिसराबाबत पत्रकारांसाठी जिल्‍धिकारी  कुमार आशीर्वाद यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना

सोलापूर दिनांक 3 जून

सोलापूर शहरातील रेल्वे लाईन मोदी परिसरात असलेल्या शासकीय गोदामात माढा लोकसभा मतदारसंघ व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन अत्यंत चोख पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत. चार जून रोजी या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दर्शकांना वाचकांना व नागरिकांना मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंतची सर्व माहिती देण्याचे काम पत्रकार करत असतात. घाई गडबडीत चुकीचं वार्तांकन होऊ नये व चुकीचे बातमी वजा माहिती बाहेर जाऊ नये म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्वच पत्रकारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रकारांना सूचना

1) मिडिया सेंटर पर्यंत पत्रकार व माध्यम कक्षातील अधिकारी कर्मचारी यांना मोबाईल सोबत नेण्यास परवानगी..

2) मतमोजणी कक्षात पत्रकारांना (प्रत्येक,भेटीला,5पत्रकार) मतमोजणी ची प्रक्रिया पाहण्यासाठी माध्यम कक्षातील कर्मचारी घेऊन जातील,परंतु मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध आहे. आपले मोबाईल मिडिया कक्षातच ठेवावेत. यावेळी मुव्ही व फोटो कॅमेरा घेऊन जाण्यास परवानगी असेल

3) पण मतमोजणी कक्षातील कामकाजाचे झूम चित्रीकरण करण्यास मनाई आहे.

4) मत मोजणी कक्षातील रेड लाईन ओलांडून कोणीही आत जाऊ नये.

5) पत्रकार ,प्रतिनिधी यांना कॅमेऱ्या सोबत ट्रायपॉड आत नेता येणार नाही.

6) रामवाडी शासकीय गोदामाच्या आतिल परिसर, आवारात कोणत्याही उमेदवार किंवा राजकीय एजंटचे बाईट घेण्यास मनाई आहे.

7) मतमोजणीचे फेरिनिहाय अपडेट त्वरीत मिडिया व्हॉट्सअप ग्रुप वर दिले जाईल.

                दैनिक लोकसंवाद

         संपादक:- सचिनकुमार जाधव

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *