Demand for OBC reservation गरजवंत मराठा तरुणाच्या गळ्यातील चैन चोरली

 

ओबीसी आरक्षणासाठी शांतता राहिली
ओबीसी आरक्षणासाठी शांतता राहिली

Demand for OBC reservation गरजवंत मराठा तरुणाच्या गळ्यातील चैन चोरली

संपादक :- सचिनकुमार जाधव

ओबीसी आरक्षण मागण्यासाठी शांतता रॅलीत सहभागी झालेल्या गरजू मराठा युवकांवर चोरांचा डल्ला

सोन्याची चैन चोरी
सोन्याची चैन चोरी

सोलापूर दिनांक 11
ओबीसी आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या शांतता रॅलीत सहभागी झालेल्या चार मराठा युवकांवर चोरांनी डल्ला मारला आहे. एकीकडे गरजवंत गोरगरीब मराठा बांधव रस्त्यावर उतरून शांततेत ओबीसी आरक्षण मागत आहेत. आणि दुसरीकडे मात्र याच गर्दीचा फायदा घेऊन गोरगरीब गरजवंत मराठा बांधवांवर चोरांनी डल्ला मारला आहे. याबाबतची तक्रार फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आली आहे.
गरजवंत गोरगरीब मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा या मागणी करिता बुधवार दिनांक 07 ऑगस्ट रोजी सोलापूर शहरात शांतता रॅलीचे आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये लाखोच्या संख्येने गोरगरीब गरजवंत मराठा तरुण तरुणी आबालवृद्ध सहभागी झाले होते. त्यापैकी

जवळपास 12 तोळे सोन्या चोरीला
जवळपास 12 तोळे सोन्या चोरीला

1] प्रकाश बलभीम डांगे ( 7.5 /साडेसात तोळ्याचे सोन्याची चैन छ. शिवाजी महाराजांच्या पेंडल सह )
2] विश्वास सुखदेव पवार ( 1.5/ दीड तोळ्याची सोन्याची चैन )
3] अमोल दिगंबर जगताप ( 2 /दोन तोळ्याची सोन्याची चैन )
4] सिद्धेश्वर विठोबा दत्तू ( 2/ दोन तोळ्याची सोन्याची चैन ) अशा चार मराठा युवकांवर गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने डल्ला मारला आहे. यात हकीकत अशी की.

 

ओबीसी आरक्षण मागणीसाठी शांत रॅली
ओबीसी आरक्षण मागणीसाठी शांत रॅली

गोरगरीब गरजूवंत मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रभर शांतता रॅलीचे आयोजन केलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातून काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीची सुरुवात सोलापूर शहरातून करण्यात आली होती. त्यामुळेच बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळपासूनच सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गोरगरीब गरजवंत मराठा तरुण तरुणी आबालवृद्ध शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात जमा होऊ लागले होते. हातात भगवा ध्वज डोक्यावर एक मराठा लाख मराठा लिहिलेल्या भगव्या टोप्या, गळ्यात भगवे उपरणे यामुळे सारा परिसर भगवामय झाल्याचं दिसून येत होतं.

शांतता रॅलीला संबोधित करण्यासाठी मनोज जरांगे यांचे दुपारी 03:34 वाजता आगमन झाले. सोलापूर शहरातील एसटी स्टँड पासून जवळच उत्तर दिशेस असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून रॅली निघाली व एसटी स्टँडच्या जवळ दक्षिण दिशेस असलेल्या जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रॅली निघाली आणि त्याच ठिकाणी रॅलीचा सभेत रूपांतर झालं.

रॅलीत सहभागी झालेल्या लाखो मराठा बांधवांच्या हजारो दुचाकी वाहने हजारो चार चाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था शहरात विविध ठिकाणी करण्यात आली होती. महानगरपालिका प्रशासन पोलीस प्रशासनानं आपली कामगिरी चोख बजावली आहे. यात काही दुमत नाही.
एकीकडे गोरगरीब गरजू गरजवंत मराठा युवक रस्त्यावर उतरून शांततेत ओबीसी आरक्षणाची मागणी करीत आहे आणि दुसरीकडे मात्र याच गोरगरीब गरजू गरजवंत मराठा बांधवांवर चोराने डल्ला मारल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे गर्दीचा फायदा घेता येऊ शकतो हे चोरांन सिद्ध करून दाखवला आहे. अशा चोरांच्या मुस्क्या वेळीच आवरल्या पाहिजेत. जेणेकरून गर्दीचा फायदा घेऊन कोणी स्वतःच उकळ पांढर करून घेऊ नये. याकरिता समाजाने व प्रशासनाने सतर्क राहील पाहिजे.
सदरच्या चोरीच्या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुंडे करीत आहेत.

 शांतता राहिली
शांतता राहिली

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *