Devendra Fadnavis On Maratha Reservation | … आणि लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीसांनी मागितली माफी

Devendra Fadnavis On Maratha Reservation

Image Source

Devendra Fadnavis On Maratha Reservation | आमच्या सरकारने मराठा समाजाला विशेष लाभ दिला, ओबीसीप्रमाणे सवलती दिल्या. परंतु जालना येथे घडलेला प्रकार अनुचीत आहे. आम्ही कधीही बळाचा उपयोग केला नाही. आताही बळाचा उपयोग करण्याचं कारणच नव्हतं. त्यामुळे ज्या निष्पाप नागरिकांवर बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झाली आहे. त्यांच्याप्रती मी शासनाच्यावतीने क्षमा मागतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज बांधवांची माफी मागीतली आहे.

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सराटी आंतरवाली, जालना येथील गावकरी बेमुदत आमरण उपोषणास बसलेले होते. सदरचे आंदोलन संवैधानिक पध्दतीने सुरू असताना पोलिसांनी बळाचा गैरवापर करून आंदोलक महिला-पुरुषांसह आबाल-वृध्दावर लाठीचार्ज आणि गोळीबारही केला. यामुळे राज्यातील मराठा समाजबांधवांनी विविध जिल्ह्यात एसटी बसेस पेटवल्या, काही प्रमाणात जाळपोळ झाली, रस्ता रोको आंदोलने केली, सरकार विरोधात घोषणाबाजी केली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेस चपलांचा हार घालण्यात आला होता. अखेर यावर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी पत्रकार परिषद घेत जालना येथे घडलेल्या घटनेबद्दला मराठा समाज बांधवांची माफी मागितली.

आज, 4 ऑगस्ट रोजी मराठा आरक्षण उपसमिती गटाची बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित होते. बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी जालना येथे उपोषणादरम्यान घडलेला प्रकार चांगला नाही. यापूर्वी हजारो आंदोलने झाली परंतु, आम्ही कधीही बळाचा वापर केला नाही.

सध्या काय घडले याची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आहेत. लोकांनी याला राजकीय मुद्दा बनवणे योग्य नाही. काही नेत्यांनी तसे करण्याचा प्रयत्न केला, हे अत्यंत खेदजनक आहे. बळाचा वापर करण्याचे आदेश सरकारकडून आल्याची खोटी अफवाही पसरवली आहे. या गोष्टींना सरकारच जबाबदार आहे, असे भासवण्याचा कोणीतरी प्रयत्न करत आहेत.Devendra Fadnavis On Maratha Reservation

मराठा आरक्जोषण कायदा २०१८ साली तयार करून आम्ही मंजूर केला. मात्र त्यानंतरच्या सरकारला तो टिकवता आला नाही. मात्र तेच उद्धव ठाकरे आता आमच्टीयावर का करून राजकारण करत आहेत.  Devendra Fadnavis On Maratha Reservation

हेही वाचा

Jalna News | जालना लाठीचार्ज घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावा संघटनेचे चक्का जाम आंदोलन

Maha E Tender | टेंडर राज्यभर प्रसिध्द, पुरवठादार मात्र स्थानिकच हवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *