Dhangar Reservation | धनगर समाजबांधवाने पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळत केली आरक्षणाची मागणी

Image Source

Dhangar Reservation | सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गेलेल्या धनगर समाज बांधवाने पालकमंत्री विखे-पाटील यांच्यावर भंडारा उधळत घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षणाची मागणी केली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि सुरक्षारक्षकांनी सबंधीत व्यक्तीस मारहान केल्याची घटना सोलापूरात शुक्रवारी घडली. यामुळे राज्यात मराठा आरक्षणानंतर धनगर समाज आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.

पालकमंत्री विखे-पाटील यांना निवेदन देण्यासाठी शुक्रवारी धनगर आरक्षण कृती समिती  गेली होती. यावेळी समितीमधील एका सदस्याने खिशातून भंडाराची पिशवी काढून पालकमंत्री विखे-पाटील यांच्या डोक्यावर उधळली. यावेळी उपस्थित सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न करत असतानाच भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी भंडारा उधळणाऱ्या व्यक्तीस मारहान सुरू केली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनीही सदरच्या धनगर समाज बांधवास मारहान केली. यावेळी  मारहान होत असतानाही धनगर समाज बांधवाने “यळकोट यळकोट जय मल्हार” आणि “आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” अशी घोषणाबाजी केली. Dhangar Reservation

या प्रकारामुळे राज्यभरातून उलट-सुलट प्रतिक्रीया येत असून धनगर समाजबांधव आक्रमक झाले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका केली जात असून काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्यभरातून आप, काँग्रेस यांच्याकडून टिका केली जात आहे.

पडळकरांची पोस्ट, काकाच्या नादाला लागू नका,… 

“खंडोबाचा, बिरोबाचा, म्हाकूबाईचा भंडारा हा श्रध्देचं प्रतिक आहे. त्याचा आंदोलनासाठी वापर करू नये. जर काहींनी तो विखे-पाटील यांच्यावर उधळला असेल तर त्याला त्यांनी आशिर्वाद समजावा. तसेच मी समस्त माझ्या बंधू-भगिनीनां आवाहन करतो की, त्यांनी “लांडग्या काका”च्या नादी लागू नका. आपण आरक्षणाची लढाई कायदेशिररित्या उच्च न्यायालयात लढतोय. अशी पोस्ट भाजपचे गोपिचंद पडळकर यांनी एक्स (व्टिटर) वर केली आहे. Dhangar Reservation

 

Dhangar Reservation

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, संबंधीतावर कारवाई करू नये

धनगर कार्यकर्त्यांकडून माझ्यावर भंडारा उधळला, पवित्र भंडाऱ्याची उधळण झाल्याने मला आनंदच आहे. तसेच अचानक भंडाऱ्याची उधळण झाल्यामुळे सुरक्षा रक्षकांकडून मारहान झाली. कारण त्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी असते. परंतु भंडारा उधळल्याने संबंधीतावर कारवाई करू नये, अशा सूचना मी पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिली.

भाजपला मारहाणीचे परिणाम भोगावे लागतील

धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वय शेखर बंगाळे यांना भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आणि इतरांकडून मारहाण झाली. त्याचा काँग्रेसकडून जाहीर निशेष. मात्र काळे यांनी धनगर समाजाची माफि मागावी, अन्यथा त्यांचे शहरात फिरणे मुश्किल करू, असा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिला. तसेच सदरच्या मारहाणीचे परिणाम भाजपला भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. Dhangar Reservation

 

भाजपच्या काळेंनी मागितली माफि

धनगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक शेखर बंगाळे यांनी खिशातून काय काढले ? हे मला समजले नाही. त्या झटापटीत माझ्याकडून अनावधानाने मारहान झाली. त्याबद्दल धनगर समाज बांधवांच्या दुखावल्या असतील तर मी समस्त धनगर समाज बांधवांची माफि मागेतो. परंतु धनगर समाजातील कार्यकर्ते आणि नेत्यांनी या गोष्टीचे भांडवल करू नये. झालेल्या चुकीबद्दल मी पुन्हा एखदा माफि मागतो, अशा शब्दात भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी माफि मागितली. Dhangar Reservation

भाजपने काळेंची हकालपट्टी करावी, अन्यथा…

भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी धनगर समाज बांधवास केलेल्या मारहाणीचा आप ने निषेध करत काळेंची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. तसेच काळेंनी माफि मागावी, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आप चे कार्याध्यक्ष निहाल किरनळ्ळी यांना दिला.

हे ही वाचा

जिल्ह्यात “जन आरोग्य समिती”च राम भरोसे

Maratha Reservation Protest | मराठा आरक्षणाबाबत आक्रमक मनोज जरांगे-पाटील कोण आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *