Extension of time Mukhyamantri majhi ladaki bahin yojana
नवीन अट, नवीन संधी लाडक्या बहिणीच्या योजनेला मिळाली तिसऱ्यांदा मुदतवाढ
संपादक:- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309
मुंबई दिनांक 12
महाराष्ट्र राज्यातील रेकॉर्ड ब्रेक योजना
रेकॉर्ड ब्रेक लाभार्थी असलेली महाराष्ट्रातील महायुतीची महत्वकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेस रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील प्रत्येक महिलांच्या तोंडी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि त्याच्यातून मिळणारे फायदे याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे. या योजनेचा फायदा राज्यातील शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे याकरिता महायुती सरकारच्या वतीने या योजनेसाठी 15 ऑक्टोंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदत वाढ दिली असली तरी फॉर्म भरण्यासाठी नवी अट घालण्यात आली आहे. पूर्वी ऑनलाईन पद्धतीने त्याचप्रमाणे मोबाईल ॲप वरून लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज करता येत होता. आता मात्र नवीन अटीनुसार फक्त अंगणवाडी सेविकेकडूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता येणार आहे. या नव्या अटीसह 15 ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे. ज्या लाभार्थी महिलेने आतापर्यंत फॉर्म भरला नाही त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी महायुती सरकारने उपलब्ध करून दिली आहे.
योजने करिता लागणारे कागदपत्रे…..
1) आधार कार्ड
2 शाळा सोडल्याचा दाखला किंवा रहिवाशी दाखला किंवा जन्म. प्रमाणपत्र
3) अर्जदाराचे हमीपत्र
4) बँक पासबुक – आधार कार्ड लिंक असलेलं
5) अर्जदार महिलेचा फोटो
6) रेशन कार्ड किंवा उत्पन्न दाखला
योजनेचा लाभ घेण्यासाठी अट….
1) महिला महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे.
2) राज्यातील विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत, विधवा व निराधार महिला अर्ज करू शकतील
3) वयोगट 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिला अर्ज करू. शकतात.
4) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख पेक्षा जास्त नसावी
महाराष्ट्रातील अति लोकप्रिय ठरलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा प्रत्येक जिल्ह्यात होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी या योजनेकडे विशेष लक्ष दिल्याचं दिसून येत आहे. या योजनेचा फायदा राज्यातील शेवटच्या महिलेपर्यंत पोहोचला पाहिजे याकरिता महायुती सरकारच्या वतीने विशेष दखल घेतली जात आहे. त्यामुळेच योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना मिळाला नाही किंबहुना ज्या लाभार्थ्यांनी फॉर्म भरले नाही त्यांच्या करिता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार अशी अफवा पसरवणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शेलक्या भाषेत वात्रट विरोधकांचा समाचार घेण्याचा कार्यक्रम चालू ठेवला आहे. आपल्या प्रत्येक भाषणात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात बोलून दाखवला आहे की, राज्यातील माझ्या दीनदलित, गोरगरीब, गरजू महिलांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी देण्यात येणाऱ्या योजनेच्या मध्ये विनाकारण अडथळा निर्माण करणारे अफवा फसवणारे वात्रट विरोधकांचा समाचार घेण्याचं ठरवलं आहे.
ही योजना कायमच चालू राहणार असल्याचे महायुती सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे.