G20 summit | मोठा आंतरराष्ट्रीय नेता G20 परिषदेसाठी भारतात येणं टाळणार ?

G20 summit

Image Source 

G20 summit | भारताच आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत प्रस्थ या नेत्याच्या डोळ्याला खुपतय का? G 20 परिषदेच यंदा भारत यजमानपद भूषवत आहे. या परिषदेच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावर एक छाप उमटवण्याची एक संधी भारताकडे आहे. या परिषदेसाठी लग्जरी हॉटेल्समधील 3500 पेक्षा अधिक रुम्स बुक करण्यात आल्या आहेत.

पुढच्या आठवड्यात भारतात G20 Summit होत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही एक महत्त्वाची परिषद आहे. जगातील प्रमुख देशांचे नेते या बैठकीसाठी भारतात येणार आहेत. राजधानी दिल्लीमध्ये ही परिषद होणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 7 ते 11 सप्टेंबर दरम्यान G20 Summit साठी सुप्रीम लीडर्स दिल्लीमध्ये एकत्र येणार आहेत. भारत यंदा परिषदेच यजमानपद भूषवत आहे. अमिरेकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन या बैठकीसाठी भारतात येणार आहेत. हे नेते आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या प्रतिनिधी मंडळाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. दिल्ली-एनसीआर भागातील लग्जरी हॉटेल्समधील 3500 पेक्षा अधिक रुम्स बुक करण्यात आल्या आहेत. G20 summit

लग्जरी रुम्समध्ये प्रेसिडेंशियल सूट सुद्धा आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये एकदम कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दिल्लीला छावणीच स्वरुप आलं आहे. काही हॉटेल्समध्ये एकारात्रीच भाड 10 लाख रुपयांच्या घरात आहे. आयटीसी मौर्य हॉटेलमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. बराक आोबामा भारतात आले, तेव्हा याच हॉटेलमध्ये उतरले होते. दिल्लीच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये रशिया आणि टर्कीच डेलिगेशन थांबणार आहे. मॉरीशेस, नेदरलँड, नायजेरिया आणि स्पेनहून येणारे पाहुणे ली मेरिडियनमध्ये उतरणार आहेत.

G20 summit मध्ये कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष अनुपस्थित राहणार?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन G20 summit ला उपस्थित राहणार नाहीयत. रशिया-युक्रेन युद्धामुळे ते भारतात येणार नाहीयत. दरम्यान आता चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सुद्धा या बैठकीला अनुपस्थित राहतील, अशी चर्चा सुरु झाली आहे. भारत-चीन विषयाशी संबंधित जाणकाराच्या हवाल्याने रॉयटर्सने हे वृत्त दिलय. जीनपिंग यांच्याजागी ली कियांग 9-10 सप्टेंबरला होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.

ते अनुपस्थित राहिल्यास अनेक प्रश्न निर्माण होणार

भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्याच्या प्रवक्त्याने यावर अधिकृत वक्तव्य केलेलं नाहीय. या परिषदेच्या निमित्ताने जिनपिंग आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची भेट होईल, असं बोलल जात होतं. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात इंडोनेशिया बाली येथील जी 20 ची परिषद झाली होती. त्यावेळी जिनपिंग बायडेन यांना भेटले होते. जिनपिंग भारतात होणाऱ्या जी 20 परिषेदला अनुपस्थित राहिल्यास अनेक प्रश्न निर्माण होतील. भारत आणि चीन दोन्ही स्पर्धक देश आहेत. सध्या सीमेवर दोन्ही देशांच सैन्य आमने-सामने आहे. चीनला नेहमीच भारताच यश पचलेलं नाही. त्यांनी कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

हे ही वाचा

INDIA Alliance Meet : इंडिया आघाडीच्या बैठकीतील नेत्यांसाठी मराठमोळ्या पदार्थांचा बेत

Gautam Adani | बाजार उघडताच Adani समूहाचे शेअर्स गडगडले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *