Hema Malini यांनी Gadar-2 पाहिल्यानंतर सनी देओल आधी ‘या’ गोष्टींचे केलं कौतुक

Hema Malini

Image Source 

Hema Malini Review on Gadar 2 : सध्या चर्चा आहे ती म्हणजे ‘गदर 2’ या चित्रपटाची. या चित्रपटानं सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. सध्या न भूतो न भविष्यति असं यश या चित्रपटाला मिळालेलं आहे. Hema Malini यांनी हा चित्रपट पहिला असून याचे त्यांनी कौतुक केले आहे. त्या म्हणाल्या, ”हा चित्रपट पाहिल्यानंतर देशासाठी जी देशभक्ती आहे ती असायला पाहिजे. ती आहेच. या चित्रपटाच्या शेवटी मुस्लिमांसोबत बंधूभावाची गोष्टी दाखवण्यात आली आहे. हा भारत आणि पाकिस्तानसाठी चांगला मेसेज आहे.”

परंतु आता सिनेमा हा आंतरराष्ट्रीय अधिक झाला आहे. त्यामुळे या चित्रपटाचे यश हे वेगवेगळ्या प्रमाणांमध्येही मोजले जाते. आज 2023 मध्ये तब्बल 110 वर्षांनंतर चित्रपटसृष्टी ही फार पुढे गेली आहे. आज सोशल मीडियाचा जमाना आलेला आहे. त्यावेळीही परदेशातील कलाकरांनी आपले कौतुक केले होते. जे दादासाहेब फाळके यांनी केले ते कधीच कोणीच करू शकणार नाही. इतकी त्यांची ख्याती आणि प्रतिभा आहे. गदर 2 हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटानं फार बॉक्स ऑफिसवर फार मोठ्या प्रमाणात गल्ला भरला आहे.

300 कोटी रूपये फक्त 9 दिवसात कमवण्याची किमया Gadar 2 न यशस्वी केली आहे. यावेळी धर्मेंद्र यांच्यापासून ईशा देओल आणि अहाना देओल यांनीही हा चित्रपट पाहिला आहे. त्यातून आता हेमा मालिनी यांनीही गदर 2 पहिला आहे. यावेळी त्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. त्या हा चित्रपट पाहून झाल्यावर मूव्ही थिएटरमधून बाहेर आल्या त्यानंतर यावेळी त्यांनी पापाराझींना या चित्रपटाचा रिव्ह्यू दिला आहे. त्यांनी या चित्रपटाचे सर्वप्रथम कौतुक केले आणि कलाकारांचेही कौतुक केले. वयाच्या 74 व्या वर्षीही हेमा मालिनी या फार सुंदर आणि आकर्षक दिसतात. त्यांच्या नृत्याचे आणि अभिनयाचे आपण सर्वच फॅन्स आहोत.

यावेळी त्यांनी चित्रपटाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, ”मी गदर 2 पाहून आलीये. मला हा चित्रपट आवडला आहे. जशी अपेक्षा होती तशीच ही फिल्म आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. मला असं वाटलं की मी 70-80च्या काळात गेले आहे. त्या वेळची माणसं परत आली आहेत. अनिल शर्मा यांनी खूप चांगले दिग्दर्शन केले आहे.”

Hema Malini यांनी काल शनिवारी ही फिल्म पाहिली आहे. त्या यावेळी असंही म्हणाल्या की, ”हा चित्रपट पाहिल्यानंतर देशासाठी जी देशभक्ती आहे ती असायला पाहिजे. ती आहेच. या चित्रपटाच्या शेवटी मुस्लिमांसोबत बंधूभावाची गोष्टी दाखवण्यात आली आहे. हा भारत आणि पाकिस्तानसाठी चांगला मेसेज आहे.”

Hema Malini सनी देओल ‘शानदार’

यावेळी सनी देओलच्या अभिनयाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की,”शानदार”. त्याचसोबत त्यांनी इतरही कलाकारांचे कौतुक केले आहे

Check Also

Anand Dighe | आनंद दिघेंच्या भूमिकेवर मंगेश देसाईंनी कारण केलं स्पष्ट, म्हणाले…

Smriti Irani | टोमॅटो दरवाढीबाबत विचारताच स्मृती इराणी पत्रकारावर भडकल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *