Hindu New Year Gudi Padwa celebrate | सामूहिक गुढी पूजन व सुराज्य स्थापना शपथग्रहण संपन्न
हिंदू नववर्ष गुढीपाडवा देशभरात 388 ठिकाणी सोलापूर 17 ठिकाणी सामूहिक गुढीपूजन करून साजरा करण्यात आला.
पाढव्याचे औचित्य साधत मंदिर स्वच्छतेच्या उपक्रमाबरोबरच सुराज्य स्थापनेसाठीचा शपथ ग्रहण सोहळा आनंदोत्सवात संपन्न झाला.
सोलापूर दिनांक 9 एप्रिल[संपादक-सचिनकुमार जाधव]
गुढीपाडवा हिंदू नववर्ष शुभ दिनाचे अवचित्य साधत महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदू जनजागृती समिती, मंदिरांचे विश्वस्त व पुजारी, हिंदुत्वनिष्ठ संघटना त्याचप्रमाणे धर्मप्रेमी यांच्या पुढाकाराने देशात 338 ठिकाणी सामूहिक गुढी पूजन करून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. यामध्ये प्रामुख्यानं महाराष्ट्र राज्यासह कर्नाटक गोवा व उत्तर प्रदेश या राज्यांचा यांचा समावेश होता. सोलापूर जिल्ह्यात 17 ठिकाणी सामुहिक गुढी उभारून गुढी पूजन करण्यात आले.
प्रारंभी या मंगल प्रसंगी देशभरात मंदिर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आणि त्यानंतरच सामूहिक गुढी पूजन करून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी एकत्र येत सुराज्य स्थापन करण्याची सामूहिक शपथ घेतली. अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक तथा हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी माध्यमांना दिली आहे.
सामूहिक गुढी महाराष्ट्रात २३९, कर्नाटकात ६०, गोव्यात ३५, व उत्तर प्रदेश राज्यात ४ ठिकाणी उभारण्यात आली. सामूहिक गुढी उभारण्यात पुणे येथील ज्योतिर्लिंगश्री भीमाशंकर देवस्थान, छत्रपती संभाजीनगर येथील ज्योतिर्लिंगश्री घृष्णेश्वर देवस्थान, ओझर (पुणे) येथील श्रीविघ्नहर गणपती मंदिर, सोलापुरातील पूर्वभाग दत्त मंदिरांसह अनेक मंदिरांनी पुढाकार घेतला. तसेच काही सार्वजनिक ठिकाणी, सामूहिक गुढी उभारण्यात आली. श्री घृष्णेश्वरज्योतिर्लिंग देवस्थानामध्ये रामराज्याच्या स्थापनेसाठी, तसेच रामराज्यासाठी लढणार्या सर्व धर्मप्रेमींना शक्ती मिळावी म्हणून भगवान शंकराचा अभिषेक करण्यात आला. यात विशेष म्हणजे अनेक ठिकाणी गुढी उभारण्यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त व लक्षणिय सहभाग होता. मुंबई-पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या‘ रणरागिणी शाखे’च्या मुलींनी स्वसंरक्षणाची काही प्रात्याक्षिके दाखवली. तसेच राज्यभर अनेक हिंदु नववर्ष शोभायात्रांमध्ये सहभाग घेतला.
सामूहिक गुढीपूजन, मंदिर स्वच्छता मोहीम व स्वराज्य शपथ ग्रहण बाबत सविस्तर माहिती देताना महासंघाचे सुनील घनवट म्हणाले की, हिंदु धर्मात साडेतीन मुहूर्तांवर शुभ कृत्ये करण्याचा संकल्प केला जातो. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकीएक मुहूर्त आहे.अयोध्येत नुकतेच श्री रामलल्ला विराजमान झाल्यानंतर देशाला आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. आता देशाला आवश्यकता आहे ती रामराज्याची अर्थात् ‘स्वराज्याकडून सुराज्या’कडे जाण्याची. प्रभु श्रीरामाने सकल जनांचे कल्याण करणारे आदर्श रामराज्य स्थापन केले. तसेच आदर्श राज्य स्थापन होण्यासाठी सर्वांनी स्वतःच्या जीवनात , सामाजिक जीवनात रामराज्य आणण्यासाठी सलग काही वर्षे प्रयत्न करावे लागतील. व्यक्तीगत जीवनात स्वतः साधना करून नैतिक आणि सदाचारी जीवन जगण्याचा संकल्प करावा लागेल. सामाजिक जीवनात भ्रष्टाचार, अनैतिकता आणि अराजकता यांना विरोध करण्यासाठी प्रयत्नशील व्हावे लागेल. सात्त्विक समाजाच्या पुढाकारातूनच अध्यात्मावर आधारित राष्ट्ररचना, म्हणजेच रामराज्य शक्य आहे; म्हणूनच या गुढीपाडव्यापासून व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात रामराज्य आणण्याचा संकल्प करूया. असे आवाहन यावेळी घनवट यांनी केले.
Hindu New Year Gudi Padwa celebrate
गुढीपाडव्या बाबत ….
भारतातील प्रमुख सणांपैकी गुढीपाडवा हा एक सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते. गुढी पाडव्यापासूनच राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचासुद्धा प्रारंभ होतो.
गुढीचे स्वरूप-
चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठतात. स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात.या दिवशी महाराष्ट्रात लोक घराच्या प्रवेशद्वारी उंचावर गुढी उभारतात.उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी ,काढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात, फुलांचा हार आणि साखरेची गाढी बांधून त्यावर तांब्या / धातूचे भांडे बसवले जाते, गुढीचा बांबू पाटावर उभा केला जातो, तयार केलेली गुढी दारात ,उंच गच्चीवर लावतात.गुढीला गंध ,फुले ,अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. दुपारी गोडाचा नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते. यादिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाच्या शुभेच्छा, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस कर्नाटक आणि आंध्र प्रदेश अशा गौतमीपुत्राची सत्ता असलेल्या राज्यांत स्वातंत्र्य प्राप्तीचा आनंद झाल्यामुळे विजयदिन म्हणून संवत्सर पाडवो वा उगादी अशा वेगवेगळ्या नावांनी व वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने महाराष्ट्रात या सणाला गुढीपाडवा असे संबोधले जाते. सिंधी लोक चेटीचंड नावाने या उत्सवाला संबोधतात
संपादक :- सचिनकुमार जाधव
📞 📲 738 5352 309