आषाढी यात्रेनिमित्त जिल्हाधिकाऱ्यांचा पाहणी दौरा
ILLEGAL SAND MINING IN PANDHARPUR
अवैध वाळू उपसा उघडकीस येऊ नये म्हणून सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चंद्रभागेपासून दूर ठेवण्यात आलं आहे. असा आरोप गणेश अंकुशराव यांनी केला आहे.
सोलापूर जिल्हा [पंढरपूर] दिनांक 2 जुलै
आषाढी एकादशी सोहळा 17 जुलै रोजी होणार आहे. तत्पूर्वी अनेक संतांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होत असते. या सोहळ्यात लाखोच्या संख्येने वारकरी व भाविक प्रतिवर्षी सहभागी होत असतात. आषाढी यात्रेचं महत्त्व लक्षात घेता सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पंढरपूर मध्ये जाऊन पाहणी केली. पालखी तळावर,मार्गावर वारकरी व भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये तसेच भाविकांना पालखीतळावर प्रशासनाच्या वतीने अधिकच्या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
परंतु आषाढी यात्रेच्या निमित्ताने उपस्थित महसूल अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना चंद्रभागेच्या पात्रात नेलं नाही. कारण याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. हे सार अवैध काम जिल्हाधिकाऱ्यांच्या नजरेसमोर येऊ नये म्हणूनच महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चंद्रभागेच्या पात्रात नेलं नाही असा आरोप महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी केला आहे.
परंतु चंद्रभागेच्या पात्राकडे त्यांना नेण्याचे महसुल अधिकार्यांनी टाळले, यामुळे गणेश अंकुशराव यांनी तीव्र नापसंदी व्यक्त केली आहे.
चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळु उपशामुळं पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न कायम असुन याविरुध्द वारंवार वेगवेगळी आंदोलनं केली परंतु पंढरपुरमधील आजी माझी अधिकाऱ्यांनी हेतू पुरस्कृत दुर्लक्ष केलं आहे. आषाढी वारी तोंडावर आलेली असतानाही चंद्रभागेच्या पात्रात पडलेले खड्डे बुजवले गेले नाहीत, चंदेभागेमध्ये गटाराचे पाणी सोडले जाते, या सर्व बाबी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांच्या निदर्शनास आणुन देणेसाठी पंढरपुरातील महसुल अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना चंद्रभागा वाळवंट व नदीपात्राची पाहणी करण्यासाठी नेणे आवश्यक होते, परंतु जाणुन-बुजून या महसुल अधिकार्यांनी आपले बेकायदेशीर कृत्य उघडकीस येण्याची भीती असल्याने, जिल्हाधिकारी यांना चंद्रभागेच्या पाहणी दौर्यासाठी नेले नाही. असा गंभीर आरोप गणेश अंकुशराव यांनी केला असुन आता पुन्हा जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांना चंद्रभागा नदी पात्राची पाहणी करण्याची विनंती करणार असल्याची माहितीह त्यांनी माध्यमांना दिली आहे.
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोसोहळ्यासाठी11 जुलै रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे व 12 जुलै रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याबरोबर अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. तसेच प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, माळशिरसच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सा.बां.कार्यकारी अभियंता अमित निंबकर, सुनिता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद हे कार्यतत्पर अधिकारी असल्याने त्यांच्याकडून सर्वसामान्य जनतेच्या व वारकरी भाविकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात चंद्रभागेतील अवैध वाळु उपशाचा व अस्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरुपी मिटावा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे . त्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याची माहितीही गणेश अंकुशराव यांनी दिली आहे.
संपादक :- सचिनकुमार जाधव
Call 📞 📲 738 5352 309