In Maharashtra, the teachers’ union held a protest march across the state | महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचा राज्यभर आक्रोश महामोर्चा*
महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचा राज्यभर आक्रोश महामोर्चा*
सोलापूर दिनांक – 02,
शाळाबाहय अशैक्षणिक कामे बंद करा आम्हाला फक्त शिकवु दया आधी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य औचित्य साधून सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा जिल्ह्यातील जवळपास 4000 शिक्षकांनी सहभाग घेतला होता. अशाच प्रकारे राज्यभर शिक्षक संघाच्या वतीने आक्रोश महामोर्चा काढण्यात आला.
आक्रोश मोर्चाची सुरुवात चार पुतळा येथून झाले पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनम गेट येथे मोर्चा आला असता या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.
मोर्चाच्या मार्गावर दिलेल्या घोषणेमुळे सारा परिसर दणाणून गेला होता. शिक्षकांच्या घोषणा होत्या. बंद करा बंद करा.. अशैक्षणिक कामे बंद करा, बंद करा बंद करा… खाजगीकरण बंद करा, आम्हाला फक्त शिकवु द्या…सरकारी शाळा टिकू द्या, संयुक्त शाळा योजना…बंद झालीच पाहिजे, शाळाबाह्य कामे काढून घ्या..आम्हाला फक्त शिकवू द्या, शिक्षण हक्क कायद्याचा…विजय असो, एक दोन तीन चार… शिक्षणहक्काचा जयजयकार, सगळीकडे एकच चर्चा…संघाचा निघालाय आक्रोशमोर्चा, शिक्षक एकजूटीचा…विजय असो, शिक्षक संघाचा…विजय असो, पेन्शन आमुच्या हक्काची…नाही कुणाच्या बापाची, दारूची दुकानं गावात आली …गावातली शाळा बाहेर गेली, गुरुजी झाले बीएलओ…शिक्षणाचा झाला पोलिओ,
आक्रोश मोर्चाच्या सभेत राज्य शिक्षक संघाचे कार्यकारी अध्यक्ष एम.जे. मोरे, जिल्हा संघाचे बाबुराव काशीद, राज्य सल्लागार मंडळाचे अध्यक्ष एल. एच. कांबळे, राज्य सरचिटणीस संजय चेळकर, जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पवार, सरचिटणीस सूर्यकांत हतुरे, कार्यकारी अध्यक्ष रणजीत थिटे, कार्याध्यक्ष दिलीप ताटे, कोषाध्यक्ष महादेव जठार, चंदाराणी आतकर आदींची भाषणे झाली,
मोर्चाचे गांभीर्य ओळखून शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन शिक्षकांचे प्रश्न राज्य सरकारला कळवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सभा संपल्यानंतर नायब तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले
या प्रमुख मागण्यांकरिता होता हा आक्रोश मोर्चा*
1. शाळाबाह्य अशैक्षणिक कामे बंद करा.
2. जुनी पेन्शन लागू करण्यात यावी.
3. शाळा बचावासाठी सरकारी शाळा कार्पोरेट कंपन्याना न देणे.
4. शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावी.
5. संयुक्त शाळा योजना राबवु नये.
6. लोकप्रतनिधींकडून अवमानकारक वक्तव्ये थांबवण्यात यावी.
7. मुख्यालय राहणे अट रद्द व्हावी.
8. संच मान्यता त्रुटी दूर करण्यात यावी.
9. बदली प्रक्रिया त्रुटी दूर करावी.
10. नवीन शिक्षक भरती पूर्वी जिल्हा अंतर्गत व आंतर जिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात यावी.
11. नवीन शिक्षक भरती करण्यात यावी.
12. MS-CIT अट शिथिल करण्यात यावी.
13. शिक्षकांना १०-२०-३0 आश्वासित प्रगती योजना लागु करावी.
14. सर्व थकित बिलासाठी त्वरीत अनुदान मिळावे.
15. अशैक्षणिक शाळाबाह्य कामाच्या अनुषंगाने शिक्षकांवर दाखल केलेले गुन्हे माघारी घ्यावेत.
शिक्षकांच्या आक्रोश मोर्चा यांनी दर्शवला पाठिंबा… माजी आमदार दिलीपराव माने यांनी सहभागी होऊन शिक्षकांच्या मागण्यांचे जोरदार समर्थन केले. मोर्चाला जुनी पेन्शन हक्क संघटना, एकल शिक्षक संघटना, सांगोला तालुका आदर्श शिक्षक समिती, शिवाजीराव पाटील गट शिक्षक संघ, विश्वगामी अधिकारी व कर्मचारी संघटना, अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना, शिक्षक सहकार संघटना, कुळूर कैकाडी समाज संघटना, मराठा क्रांती मोर्चा विठ्ठल शुगर चे चेअरमन अभिजीत पाटील यांनी उपस्थळी उपोषण स्थळी भेट देऊन संयुक्त शाळा योजना, शाळांचे खाजगीकरण, कॉन्ट्रॅक्ट बेसवर शिक्षकांची नियुक्ती आदी शासनाच्या योजना जनता मान्य करणार नसल्याचे सांगितले.
मोर्चेत आप्पासाहेब देशमुख, ज्योतीराम बोंगे, विजय तडकलकर, अभिजीत सुर्डीकर, अशोक पवार, नागनाथ क्षीरसागर, राजेंद्र वायसे, सुहास कुलकर्णी, हरीभाऊ जाधव, सीता नामवार, गुलाबराव पाटील, हणमंत सरडे, तानाजी गुंड, सत्यवान जैनजांगडे, राजेंद्र आवारे, रमेश शिंदे, राणी लेंगरे, दमयंती पाटील, अश्विनी गोरड, रफिक मुलाणी, लक्ष्मीकांत तळवार, मल्लिकार्जुन सोमेश्वर, संजय इरवाडकर तालुका अध्यक्ष पंडीत साबा, परमेश्र्वर किणगी, संभाजी तानगावडे, मोहन अवताडे, दत्ता एडगे, राजेंद्र आवारे, सचिन देशमुख, संजय काशिद, महावीर उन्हाळे, विजय शिंदे आदींसह सुमारे 4000 शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.
मोर्चा यशस्वी होण्याकरिता ईरण्णा मैंदर्गी, प्रसिद्धी प्रमुख प्रमोद कुसेकर, प्रशांतसिंह रजपूत, निवास माळी, अनिल म्हेत्रे, मधुकर राठोड, मनोहर एकतपुरे, फिरोज शेख, अनिल जाधव, विजयकुमार बंदिछोडे, लक्ष्मण वाघमोडे, आप्पा खरात आदींनी परिश्रम घेतले.