Jawan | “जवान”मधील कोणत्या कलाकाराने किती घेतले मानधन ?

 

Image Source

शाहरुखच्या ‘Jawan‘ चित्रपटात कलाकारांची फौज आहे. या चित्रपटासाठी शाहरुखने तगडं मानधन स्वीकारलं आहे. याशिवाय त्याला चित्रपटाच्या नफ्याचा काही भाग मिळणार आहे. यामधील कोणत्या कलाकाराने किती मानधन घेतले आहे जाणून घेऊया.

बॉलीवूडचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान त्याच्या ‘जवान’ या नव्या चित्रपटासाठी पुन्हा चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांना तो खूप आवडला आहे. या चित्रपटात शाहरुख ५ वेगवेगळ्या भूमिका साकारणात असून त्यात इतरही अनेक दिग्कगज कलाकार आहेत. ज्या प्रेक्षकांनी ट्रेलर पाहिला त्यांना चित्रपटाच्या कथेबद्दल उत्सुकता आहे. ‘जवान’ सिनेमाच्या पहिल्या दिवशी खूप कमाई करू शकतो, कारण अनेकांनी आधीच तिकीट बुक केले आहे. हा चित्रपट दक्षिण भारतातील अटली यांनी दिग्दर्शित केला आहे. आणि तो बनवण्यासाठी खूप मोठे बजेट होते. शाहरुखचा हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. Jawan

Jawan शाहरुखचं मानधन

Jawan’ मधल्या भूमिकेसाठी शाहरुखने तब्बल 100 कोटी रुपये मानधन घेतल्याचे कळतंय. तसेच जवानच्या नफ्याचा काही भाग किंग खान शाहरुखला मिळणार आहे. यामध्ये शाहरुखसोबत प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत असणार आहे. नयनताराचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. त्यासाठी तिने 11 कोटी रुपये मानधन घेतले आहे. तसेच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार विजय सेतुपती याची महत्वाची भूमिका आहे. शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटात तो खलनायकाच्या भूमिकेत आहे. या भूमिकेसाठी त्याने 21 कोटी रुपये मानधन घेतले आहे. Jawan

शाहरुख खान, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्याशिवाय या चित्रपटात दीपिका पदुकोण, सान्या मल्होत्रा, प्रियामणी आणि सुनील ग्रोव्हर देखील आहेत. चित्रपटात दीपिकाचा भाग छोटा असला तरी तिला 25 ते 30 कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेस’मधील शाहरुखसोबत ‘वन टू थ्री फो’ गाण्यात जबरदस्त काम करणाऱ्या प्रियमणीला दोन कोटी रुपये मानधन मिळाले होते. आणि ‘दंगल’ चित्रपटात असलेल्या सान्या मल्होत्राला एक ते दोन कोटी रुपये मानधन मिळाले. Jawan

शाहरुख खानचा पठाण नावाचा चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता आणि चित्रपटगृहांमध्ये त्याने चांगली कमाई केली होती. त्यामुळे आता त्याचा ‘जवान’ हा पुढचा चित्रपट आणखी चांगला व्हावा अशी लोकांची अपेक्षा आहे. ‘जवान’ हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा एक खास चित्रपट आहे कारण हिंदी चित्रपटसृष्टीत अटली पहिल्यांदाच काम करत आहे. Jawan

हेही वाचा

Gadar 2 | ‘गदर 2’ ने KGF 2 ला मागे टाकत बनवले नवे रेकॉर्ड

Abdul Karim Telgi | हर्षद मेहताच्या Scam 1992 घोटाळ्यानंतर OTT वर येतोय तेलगीचा स्टॅम्प घोटाळा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *