लँड माफिया अटकेत
Land mafia Karajgi arrested | जुनी मिल जागेचा घोटाळा अंगलट
जुनी मिल जागेचा घोटाळा कुमार करजगीच्या अंगलट
सोलापुरातील अनेक बिल्डर्स व भूमापियाचे दडलेले प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता
[Sachinkumar Jadhav]
मुंबई 27 मार्च:- सोलापुरातील जुनी मिल जागेच्या घोटाळ्यातील भूमाफिया कुमार शंकर करजगी याचा जामीन रद्द करण्याची सुनावणी बुधवार दिनांक 27 मार्च रोजी मुंबई उच्च न्यायालयामध्ये चालू होती. यादरम्यान माननीय न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी कुमार शंकर करजगी यास अटक करून पोलिसांच्या ताब्यात दिले. सकाळी सुनावणी सुरू असताना त्याला ही अटक करण्यात आली होती .दुपारच्या सत्रामध्ये कुमार करजगीच्या वकिलांनी आठ दिवसांमध्ये आपले लेखी म्हणणे मांडण्याची कबुली दिल्यानंतर कुमार करजगी यास दुपारी तीनच्या सुमारास कोर्टातून पोलिसांच्या ताब्यातून सोडण्यात आले.
हे सुद्धा वाचा वस्तुनिष्ठ इतिहास अभ्यासण्यासाठी मोडी लिपी शिकणे गरजेचे | माया पाटील
यामध्ये सविस्तर हकीकत अशी की कुमार करजगी व त्याच्या साथीदार सुरेंद्र कर्णिक यांना 2017 मध्ये जुनी मील जागेच्या घोटाळ्याबाबत अटक करण्यात आली होती. त्यानंतर कुमार करजगी यास नोव्हेंबर 2017 मध्ये काही अटींवर जामीन देण्यात आला होता.त्यापैकी कुमार करजगीने नियमित कोर्टात हजर न राहणे, पोलिसांकडे हजेरी न लावणे ,तसेच जुन्या मिल जागेचे गैरव्यवहार चालूच ठेवणे, जुनी मिल ट्रस्टच्या मेंबर्सवर दबाव आणणे अशा गोष्टी सातत्याने चालू ठेवलेल्या होत्या. 13 मार्च रोजी जुनी मील बेकार कामगार ,वारसदार आणि जनहित संघर्ष समिती, सोलापूर या ट्रस्टचे अध्यक्ष औदुंबर आकुडे व सचिव डॉ.संदीप आडके यांना नगर भूमापन कार्यालयात मारामारी, दमदाटी व जिवे मारण्याची धमकी दिल्यामुळे कुमार करजगी व त्याच्या दोन साथीदारांवर एफ आय आर दाखल झालेली होती. त्याबाबतीत सुद्धा कुमार करजगीच्या वकिलांना कोर्टासमोर सक्षम युक्तिवाद करता आला नाही.
त्यामुळे मेहरबान कोर्टाने या नवीन झालेल्या एफआयआर मध्येच कुमार करजगी व त्याच्या दोन हस्तकांना का अटक केल्या गेलेल्या नाहीत ? असा प्रश्न पोलिसांना विचारला. या अतिशय संवेदनशील प्रकरणामध्ये मध्ये नुकत्याच झालेल्या दोन F I R ची माहिती घेऊन सोलापुरातून पोलीस अधिकारी कोर्टात हजर होते.
या दाव्यामध्ये सरकारी वकील अमित पालकर व जुनी मील ट्रस्ट द्वारे आर व्ही संकपाळ अँड असोसिएट्स हे काम पाहत आहेत.
शासनाच्या नियमांना पायदळी तुडवत सोलापुरातील अनेक भूमाफियांनी गैरमार्गाने जमिनी विकत घेतले आहेत. अशा सर्वच भूमाप्यांची चौकशी व्हावी, आतापर्यंत या भूमाफियांनी किती जमिनी घेतल्या ? कोणापासून घेतल्या ? त्याची विल्हेवाट कशी लावली ? याची सर्वच चौकशी ED मार्फत होणे गरजेचे आहे. भूमापियाशी व्यवहार करणारे त्याचे सगेसोयरे व त्याचे भागीदार हे सर्वच गोत्यात येणार आहेत. याकरिता सामाजिक संघटना व आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या माध्यमातून लवकरच सर्व पुराव्यानिशी पत्रव्यवहार करणार आहोत. त्यामुळे सोलापूरसह राज्यातील इतर ठिकाणी असणाऱ्या भूमाप यांची माहिती आम्हाला द्यावीत आम्ही ते नक्कीच उजेडात आणणार.
संपादक :- सचिनकुमार जाधव