Lok Sabha General Election 2024 Voter ID Card
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदानासाठी ओळखीचे पुरावे म्हणून मतदार ओळखपत्राबरोबर अन्य 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार -उपजिल्हा निवडणूक अधिकारी
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी मतदान
सोलापूर दि.05 (Sachinkumar Jadhav)
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. आयोगाच्या 19 मार्च 2024 च मार्गदर्शक सूचनानुसार मतदार ओळखपत्र व अन्य 12 पुरावे ग्राह्य धरण्यात आलेले आहेत. मतदारांनी मतदार ओळखपत्र बरोबरच छायाचित्र असलेले खालील पुरावे मतदान केंद्रावर दाखवल्यानंतर त्यांना मतदान करता येणार आहे. ते पुरावे खालील प्रमाणे आहेत अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.
आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक/पोस्ट ऑफीसने जारी केलेल्या छायाचित्रासह पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांचेव्दारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, केंद्र/राज्य सरकार/सार्वजनिक उपक्रम / पब्लिक लिमिटेड कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदारांना / आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र,भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले विशेष विकलांगता प्रमाणपत्र तसेच प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मुळ पासपोर्ट (Original Passport) आवश्यक राहील.
मतदारांच्या ओळखीचा पुरावा म्हणून मतदार माहिती चिठठी (Voter Information Slip) ग्राहृय असणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी.अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.