Makar Sankrant निमित्त महिला मेळावा

महिला मेळावा

Makar Sankrant निमित्त महिला मेळावा

 हळद-कुंकू तिळगुळ आणि वाण वाटप

संत सेना मल्टिपल निधी व आत्मनिर्भर महिला बचत गटाचा संयुक्त उपक्र

सोलापूर दिनांक 24 ( Sachinkumar Jadhav)

मकर संक्रांतीचे औचित्य साधत संत सेना मल्टिपल निधी व आत्मनिर्भर महिला बचत गटाच्या संयुक्त विद्यमान बुधवार दिनांक 17 जानेवारी रोजी डोणगाव रोड येथील इंद्रप्रस्थ फेज थ्री या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता महिला मेळावा आयोजित करून हळदीकुंकू व तिळगुळ तथा वाण वाटप  कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला. या मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून परिसरातील माजी नगरसेविका सुनिता रोटे ह्या उपस्थित होत्या.

 

नवीन वर्षाच्या पहिल्या सणाची सुरुवात मकर संक्रांति पासून होते. भारत देशात मकर संक्रांतीला विशेष असं महत्त्व आहे. उत्तर भारतासह महाराष्ट्रातील सोलापूर शहरात मकर संक्रांतीचा सण मोठ्या आनंदोत्सवांना साजरा केला जातो. मकर संक्रांत खास करुन महिलांचा सण आहे. त्यामुळेच तो त्यांचा अत्यंत आवडीचा सण आहे. कारण यादिवशी सुगड पुजण्यापासून ते मकर संक्रांत सुरु झाल्यानंतर १५ दिवस सर्वत्र हळदीकुंकवाचा कार्यक्रम सुरु होतो. याच मकर संक्रांतीचं औचित्य साधत संत सेना मल्टिपल निधी व आत्मनिर्भर महिला बचत गटाच्या अध्यक्षा सुनिता दळवी यांनी महिला मेळाव्याचं आयोजन करून या ठिकाणी हळदीकुंकू व तिळगुळ तथा वाण वाटप करण्याचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी संत सेना मल्टिपल निधी व आत्मनिर्भर महिला बचत गटाच्या अध्यक्ष सुनीता दळवी यांनी मान्यवरांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. याप्रसंगी रूपाली कोळी, प्रियंका कोल्हे ,डॉ. माधुरी पारपल्लीवार, प्रज्ञा गुंड, अमृता कुलकर्णी, सुजाता डोंगरे व ह. भ. प. मातोश्री पुष्पा महाराज यांच्यासह परिसरातील शेकडो महिला उपस्थित होत्या.

प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना सुनीता रोटे म्हणाल्या, महिला बचत गट हा फक्त बचत गट नसून ते महिलाचे एक संघटन आहे. महिलांनी एकत्र येऊन आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी,  योजना प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी बचत गटाची निर्मिती केली जाते. अध्यक्ष सुनिता दळवी यांनी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करून नारीशक्ती बळकट करण्याचा प्रयत्न केला केला आहे असं त्या म्हणाल्या.

महिलांनी चूल आणि मूल यामध्ये अडकून  न राहता. स्वयंरोजगार निर्मितीचे धडे आत्मसात केले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकजूट झालं पाहिजे असे प्रतिपादन सुनिता दळवी यांनी याप्रसंगी केले.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *