Maratha Reservation Protest | गेल्या चार दिवसांत मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दल राज्यभारत चर्चा केली जात आहे. मराठा आरक्षणबाबत त्यांची सडेतोड आणि आक्रमक भूमिका आहे. त्यामुळे कोण आहेत मनोज जरांगे पाटील? जाणून घेऊया…
मनोज जरांगे-पाटील हे अंतरवली सराटी गावातील रहिवासी आहेत. मराठवाडा येथे सरकारने मराठा समाजाला विशेष संधी द्यावी, अशी त्यांची इच्छा असल्याने ते आंदोलने करत आहेत. Maratha Reservation Protest
मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्यासाठी सरकार जोपर्यंत विशेष नियम बनवत नाही. तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. सप्टेंबरमध्ये पोलिस आणि आंदोलकांमध्ये वाद झाला. परिणामी पोलिसांकडून लाठीचार्ज आणि गोळीबाराची घटना घडली, जिचे पडसाद सध्या महाराष्ट्रभर पडले आहे. Maratha Reservation Protest
यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद, रस्ता रोको आंदोलणे झाली. परिणामी गिरीश महाजन, अतुल सावे, संदिपान भुमरे यांच्यासह सरकारच्या मंत्र्यांचा गट जरांगे यांना भेटायला गेला. गिरीश महाजन म्हणाले की, ही समस्या दूर करण्यासाठी जरांगे यांना एक महिना वाट पाहावी लागेल. काल मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सरकारची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी सर्वांचे आरक्षणावर एकमत झाले आहे. Maratha Reservation Protest
गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, काही तांत्रिक अडचणींमुळे आरक्षणस काही दिवस लागू शकतात. पण काळजी करू नका, सरकार हा विषय निकाली काढणार आहे.
“समितीची नियुक्ती होऊन तीन महिने झाले आहेत. त्यामुळे थोडा वेळ लागेल. मनोज जरांगे यांनी धीर धरावा लागेल. त्यांना आम्ही जास्त दिवस उपोषण करू देणार नाही.”
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि बाळाचा वापर केला. ही दुःखद घटना आहे आणि बळाचा वापर योग्य नव्हता. यामुळे निष्पाप लोकांना दुखापत झाली आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण करून राजकारणात अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. Maratha Reservation Protest
जरांगे-पाटील म्हणाले “पोलिसांकडून हल्ला करण्यात आला. गोळीबार करण्यात आला. आमच्या गावातले खूप लोक त्यात जखमी झाले. आमच्या लोकांवर लाठीचार्ज करून त्यांना काय मिळालं माहिती नाही. आमचं आंदोलन ते मोडीत काढायला निघाले, पण आज महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आमच्या पाठीशी उभा राहिलाय.”
गावकऱ्यांनी दगडफेक केल्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचं म्हटलं जात आहे, असं विचारल्यावर त्यांनी म्हटलं, “लोकांनी पोलिसांना हाणलं असं गृहमंत्री सांगत आहेत. पण पोलिसांनी आमचे लोक दांड्याखाली तुडवलेत.”
आम्हाला सरकारकडून मराठा आरक्षणाचा अध्यादेश हवा, गावकऱ्यांवर केलेल्या पोलिस केसेस माघारी घ्यायला हव्या आणि गावात आलेले सर्व पोलिस कर्मचारी बडतर्फ केले पाहिजे, या 3 प्रमुख मागण्यांसह मराठा आरक्षणासाठीचं उपोषण सुरुच ठेवणार आहे, अशी माहिती जरांगे यांनी दिली.