oppose to the office of Deputy Registrar | सत्ताधारी पक्षातील दोन नेते समोरासमोर

    oppose to the office of Deputy Registraroppose to the office of Deputy Registrar

Oppose to the office of Deputy Registrar
अंगरला दुय्यम निबंधक कार्यालय सत्ताधारी गटाच्या उमेश पाटलांचा विरोध

oppose to the office of Deputy Registrar

मोहोळ (सोलापूर जिल्हा) तालुक्यात अनगर येथे नवीन दुय्यम उपनिबंधक कार्यालय मंजूर झाल्याचे शासन आदेश झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट )उमेश पाटील यांनी व्यक्तिगत पातळीवर जाहीर विरोध व्यक्त करतो. वास्तविक मोहोळ येथे अस्तित्वात असलेल्ले दुय्यम उपनिबंधक कार्यालय पुर्ण क्षमतेने वापरले जात नसल्याचा व त्यामुळे त्याच तालुक्यात दुस-या कार्यालयाची आवश्यकता नसल्याचा अहवाल असताना राजन पाटील यांनी केवळ स्वत:च्या गावात एखादे महत्वाचे शासकीय कार्यालय आणले हे दाखवण्यासाठी हा अट्टाहास आहे. हा शासनाच्या निधीचा गैरवापर आहे. सत्तेचाही गैरवापर आहे. असा आरोप उमेश पाटील यांनी राजन पाटील यांच्यावर केला आहे.
oppose to the office of Deputy Registrar

जर दुसरे दुय्यम उपनिबंधक कार्यालय आणायचेच होते तर ते कुरूल किंवा कामती भागात आणायला हवे होते. त्या भागातील लोकांना अंतराच्या दृष्टीकोनातून कामती पोलिस स्टेशन प्रमाणे दुसरे उपनिबंधक कार्यालय मंजूर केले असते तर ते लोकांच्या सोयीसाठी उपयुक्त होते. परंतु अनगरला दुय्यम उपनिबंधक कार्यालय हे कुणाच्या सोयीसाठी करण्यात येत आहे ? मोहोळ मध्ये उजळ माथ्याने येऊन खरेदीखते करायला कुणाला भीती वाटत आहे? आज दुय्यम उपनिबंधक कार्यालय अनगरला नेले, उद्या क्रिडा संकुल जाईल व याच अनगरांच्या हातात पुन्हा सत्ता गेली तर मोहोळचे तहसिल कार्यालय,पोलिस स्टेशन,ग्रामीण रूग्णालय,महावितरण मुख्यालय,फॅारेस्ट ॲाफीस,पंचायत समिती तसेच अजितदादांनी मंजूर केलेली 25 कोटीची प्रशासकीय इमारत देखिल अनगरलाच जाण्याची भीती उमेश पाटलांनी व्यक्त केली आहे.

oppose to the office of Deputy Registrar

मोहोळ विधानसभा मतदारसंघात पुर्वीच्या मोहोळ-मंगळवेढा मतदारसंघातील 55 गावे समाविष्ठ झाली आहेत. या गावांच्या प्रशासकीय सुविधांचा विचार न करता अतिशय संकुचित मनोवृत्तीचे प्रदर्शन करत स्वत:त्या गावापुरताचा स्वार्थी विचार मोहोळ तालुका सहन करणार नाही. आम्ही एकाच पक्षात व एकाच नेत्याच्या नेतृत्त्वात काम करत असलो तरी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नाच्या विरोंधात जर कुणी काम करत असेल तर त्याला माझा व्यक्तिगत पातळीवर विरोध राहील. असं उमेश पाटलांनी म्हटला आहे.
oppose to the office of Deputy Registrar
महसूल मंत्र्यांना अनगरचे नविन दुय्यम उपनिबंधक कार्यालय रद्द करून ते कामती किंवा कुरुल येथे मंजूर करणेबाबत मी व्यक्तिश: विनंती करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) उमेश पाटील यांनी माध्यमांना दिले आहेत
oppose to the office of Deputy Registrar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *