Image Source
Pew research | G-20 परिषदेची एक महत्त्वाची बैठक 8 ते 10 सप्टेंबरदरम्यान दिल्लीत होणार आहे. या बैठकीस विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सध्या या बैठकीसाठी देशात जोरदार तयारी सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रियता आणि प्रभाव यांच्याशी संबंधित एक सर्वेक्षण समोर आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत 80 टक्के देशातील नागरिकांचं सकारात्मक मत आहे, असं अमेरिकेच्या प्यू रिसर्च या थिंक टँकने केलेल्या या सर्व्हेमध्ये सांगण्यात आलं आहे. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर सर्व्हेनुसार, 10 पैकी 8 भारतीय नरेंद्र मोदींना पसंत करतात. Pew research
यामध्ये 55 टक्के भारतीयांनी नरेंद्र मोदी यांना आपली पहिली पसंती दर्शवली. तर, उर्वरित 20 टक्के नागरिकांना नरेंद्र मोदी आवडत नाहीत. Pew research
Pew research नरेंद्र मोदींवर इतर देशांच्या नागरिकांना किती विश्वास?
भारताबाहेरील नागरिक पंतप्रधान मोदी यांच्याबाबत काय मत बाळगतात, तसंच ते मोदींवर विश्वास दर्शवतात किंवा नाही, हा प्रश्नही सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. त्याचं उत्तरही आपल्याला विस्ताराने मिळतं. जगातील 12 देशांच्या प्रौढ नागरिकांना मोदींबाबत मत विचारण्यात आलं.
जागतिक पातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या क्षमतेवर 40 टक्के लोकांना भरवसा नाही. तर 37 टक्के नागरिकांना त्यांच्यावर थोडाफार विश्वास दर्शवतात, असं यामध्ये दिसतं. Pew research
विशेषतः मेक्सिको, ब्राझील येथील नागरिक नरेंद्र मोदी यांच्या प्रती नकारात्मक मत बाळगतात. सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना मोदींच्या परराष्ट्र धोरणावर जास्त विश्वास वाटत नाही.
या सर्व्हेतील माहितीनुसार, अमेरिकेतील 37 टक्के नागरिक पंतप्रधान मोदींवर विश्वास दर्शवत नाहीत. तर 21 टक्के लोकांना त्यांच्याबाबत विश्वास वाटतो.
अमेरिकेतील 42 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत ऐकलेलंच नाही किंवा त्यांना सर्व्हेमध्ये भाग घ्यायचा नाही, असं त्यांनी म्हटलं. तर, जपान, केनिया आणि नायजेरियातील लोकांना मोदींवर भरवसा वाटतो.
विशेषतः केनियाचे नागरिक पंतप्रधान मोदी यांच्या क्षमतेवर विश्वास बाळगतात. येथील 60 टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी मोदींची कार्यक्षमता आणि निर्णयक्षमता यांच्यावर किमान काही प्रमाणात विश्वास वाटतो. Pew research
जपानच्या 45 टक्के नागरिकांना पंतप्रधान मोदी यांच्याबाबत विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे विश्वास न दर्शवणाऱ्या नागरिकांचं प्रमाण हे 42 टक्के आहे.
इंडोनेशिया आणि दक्षिण कोरियामध्येही नरेंद्र मोदी यांच्यावरचा विश्वास कायम असल्याचं दिसून येतं. सर्व्हेमधील बहुतांश निष्कर्ष हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा भारतीय जनता पक्ष यांच्या बाजूने दिसून येता. असं असूनही भाजपचे कोणतेच नेते या सर्व्हेबाबत चर्चा करताना दिसून येत नाहीत. भाजपच्या कोणत्याही अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या सर्व्हेचा उल्लेख आढळून येत नाही.
“विरोधी पक्षांकडे चेहराच नाही, त्यामुळे मोदींची लोकप्रियता कमी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सर्व विरोधी पक्षाचे नेते मोदींसमोर खुजे आहेत. सर्व्हेबाबत बोलायचं झाल्यास असे सर्व्हे खूप येतात, त्यात काही विशेष असं नाही.”
“या सर्व्हेंच्या विश्वासार्हतेवर नेहमीच प्रश्नचिन्ह असतं. पंतप्रधान मोदींचा गवगवा आधीपासूनच आहे. त्यामुळे सर्व्हेतून ते जाणून घेण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. आमचा पक्ष काम करणं आणि त्याची अंमलबजावणी करणं यावर विश्वास ठेवतो.”
सर्व्हेत भारतीयांनाही इतर सहा देशांबाबत मत विचारण्यात आलं. यामध्ये अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स यांचा समावेश आहे.
निष्कर्षानुसार, भारतीयांनी म्हटलं की गेल्या काही वर्षांत अमेरिकेचा वरचष्मा वाढत चालला आहे. केवळ 14 टक्के लोकांच्या मते, गेल्या काही वर्षांत अमेरिकेचा प्रभाव घसरला आहे.
रशियाबाबत विचार केल्यास बहुतांश भारतीयांना त्यांचा प्रभाव वाढत असल्याचं वाटतं. तर, चीनप्रति बहुतांश भारतीयांचं मत टीकात्मक आहे. 67 टक्के भारतीयांचं चीनबद्दलचं मत नकारात्मक आहे. 48 टक्के भारतीयांना चीनचे राष्ट्रपती शि जिनपिंग यांच्याबाबत बिलकुल विश्वास वाटत नाही. Pew research