Image Source
Rahul Gandhi |काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या लडाख दौऱ्यावर आहेत. पँगॉन्ग लेकवर Rahul Gandhi यांनी त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. तसेच या भागात राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या प्रार्थना सभेला राहुल यांनी हजेरी लावली.
प्रार्थना सभेनंतर राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी Rahul Gandhi म्हणाले, मला इथल्या लोकांनी सांगितलं, चीनचं सैन्य भारतीय सीमेत घुसलं आहे. दुसऱ्या बाजूला आपलं सरकार आणि आपले पंतप्रधान दावा करत आहेत की आपली एक इंचही जमीन गेलेली नाही.
Rahul Gandhi म्हणाले इथले लोक त्यांच्या गायी-म्हशींना ज्या ठिकाणी चरण्यासाठी घेऊन जात होते ती जमीन (चरई क्षेत्र) चीनने बळकावले आहे. त्यामुळे हे लोक तिकडे त्यांची जनावरं नेऊ शकत नाहीत. लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि महागाई वाढली आहे. परंतु, जनतेचं गाऱ्हाणं सरकार ऐकत नाही, आम्ही ते ऐकून घेऊ. यावेळी राहुल गांधी यांनी त्यांचे वडील दिवंगत राजीव गांधी यांचं स्मरण केलं. ते म्हणाले, माझे वडील हे माझ्या महान शिक्षकांपैकी एक होते.