Rohit Pawar | “रोहित पवार हे नवखे आहेत. अजित पवारांची जागा ते घेऊ पाहतायेत.” हे विधान आहे अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांचं. “मुश्रीफांनी कोल्हापुरात राष्ट्रवादी संपवली,” या रोहित पवारांच्या टीकेला उत्तर देताना उत्तरात मुश्रीफांनी वरील विधान केलं होतं.
बारामतीत Ajit Pawar यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. या स्वागताचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आमदार Amol Mitkari यांनी लिहिलं की, “तुफान, तुफान, तुफान… तुफान आलंया. अजितदादा, हॅट्स ऑफ. सभा बारामतीला, मात्र अस्वस्थता पसरली कळवा, जामखेडमध्ये. नाद खुळा.”
मिटकरी हे Ajit Pawr यांचे समर्थक मानले जातात आणि आता ते अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी होत, त्यांच्या गटाचे मुख्य प्रवक्तेही बनलेत. मिटकरींच्या ट्वीटमधील टीकेचा रोख दोन नेत्यांवर दिसतो, एक म्हणजे जितेंद्र आव्हाड आणि दुसरे रोहित पवार. एकूणच Ajit Pawr गटातील नेते हल्ली रोहित पवारांवर निशाणा साधताना दिसतायेत.
आजवर जसं Sharad Pawar आणि Ajit Pawr यांच्यातील राजकीय संबंध चर्चेचा विषय ठरत असे किंवा अजूनही ठरतात, तसंच आता Rohit Pawar आणि Ajit Pawr यांच्याबाबत होताना दिसतंय.
Rohit Pawar हे Ajit Pawr यांचे पुतणे आहेत आणि अजित पवारांच्या बंडानंतर रोहित पवारांनी ‘काकां’सोबत न जाता, ‘आजोबां’सोबत राहण्याचा निर्णय घेतलाय. रोहित पवारांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेऊन, आपली भूमिका एकप्रकारे स्पष्टच केलीय.
मात्र, तरीही Rohit Pawar हे अजित पवार यांच्यासोबतचे राजकीय आणि व्यक्तिगत संबंध वेगवेगळे ठेवू पाहतात. तसे ते अनेकदा माध्यमांशी संवाद साधताना बोलूनही दाखवत आहेत. परंतु राजकारणात एकमेकांचे स्पर्धक असलेले आणि तेही एकाच कुटुंबातल्या दोन व्यक्तींना हे शक्य आहे का? किंवा Ajit Pawar आणि Rohit Pawar यांच्यात आता नेमके कसे संबंध आहेत? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, पवार कुटुंबातील ‘काका-पुतण्या’ वादाचा हा पुढचा अंक आहे का?
या प्रश्नांकडे येण्यापूर्वी आपण Rohit Pawar आणि त्यांच्या राजकीय वाटचालीबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
Rohit Rajendr Pawar हे शरद पवारांचे नातू आहेत. रोहित पवारांची राजकीय कारकीर्द बारामतीतूनच सुरू झाली. 2017 मध्ये पुणे जिल्हा परिषदेचे ते सदस्य बनले. त्यांचा झेडपी मतदारसंघ बारामतीतलं शिरसूफळ हा होता. मात्र, दोन वर्षांनी आलेल्या म्हणजे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र त्यांनी राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच ‘रिस्क’ घेतली. अहमदनगरमधील कर्जत-जामखेड मतदारसंघातून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले.
खरंतर कर्जत-जामखेडचा भाग विखे-पाटलांच्या प्रभावाचा. पण रोहित पवारांसाठी हा भाग तसा अगदीच नवीन नव्हता. कारण रोहित पवारांचे आजोबा अप्पासाहेब पवार कधीकाळी विखे-पाटलांच्या कारखान्याचे एमडी होते. मात्र, आई सुनंदा पवार यांचं या भागातील महिलांसाठीचं कामही रोहित पवारांना फायद्याचं ठरलं.
Rohit Pawar हे राजकारणात आल्यापासून शरद पवारांसारखंच राजकारण करताना दिसतात. ते विविध संस्था-संघटना-व्यक्तींशी संबंध जोडून, आपलं स्वतं:चं असं जाळं निर्माण करण्याचा ते प्रयत्न करताना दिसतात. अर्थात, ही शिकवण त्यांना शरद पवारांकडूनच मिळालीय.
रोहित पवारांना राजकीयदृष्ट्या तयार करण्याचं काम स्वत: sharad pawar यांनी आठ-दहा वर्षांपूर्वीपासून केलंय. Rohit Pawar उघडपणे राजकारणात प्रवेश करण्याआधीपासूनच शरद पवार त्यांना विविध ठिकाणी घेऊन जायचे, लोकांच्या गाठीभेटी घालून द्यायचे. शरद पवारांनी स्वत: Rohit Pawar यांना महाराष्ट्र समजावून देण्याचा प्रयत्न केला होता.
शरद पवार हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ज्याप्रमाणे राजकारणाव्यतिरिक्त इतर व्यासपीठांवर, मग ते साहित्याचं असो वा उद्योगाचं असो, तिथं दिसत असत आणि त्यातून राजकारणाच्या बाहेरही आपलं जाळं त्यांनी निर्माण केलं, त्याच पावलावर पाऊल टाकताना Rohit Pawar दिसतात.
कॅबिनेट मंत्री असलेल्या हसन मुश्रीफ यांनी उघडपणे असं म्हणणं की, “रोहित पवार हे अजित पवारांची जागा घेऊ पाहतायेत” किंवा अजित पवारांचे निकटवर्तीय असलेले आमदार अमोल मिटकरींनी अजित पवारांच्या बारामतीतल्या स्वागतावरून रोहित पवारांवर निशाणा साधणं, या गोष्टींमुळे Rohit Pawar आणि Ajit Pawar या ‘काका-पुतण्या’च्या संघर्षाची सुरुवात झालीय का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
“रोहित पवारांना पुढे आणण्यात शरद पवारांचा वाटा मोठा आहे. त्यामुळे देखील रोहित पवारांचा ओढा शरद पवारांकडे आहे. त्यामुळे जुन्या फळीला अंगावर घेण्याची मानसिक तयारी रोहित पवारांनी केलेली दिसते. तरीही रोहित पवार कितीही आक्रमक झाले, तरी ते अजित पवारांवर थेट बोलत नाहीत. ते दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ यांच्यासारख्या इतर नेत्यांवर टीका करताना दिसतायेत.”
रोहित पवार हे राष्ट्रवादीतल्या फुटीकडे संधी म्हणून पाहताना दिसतायेत, त्यामुळे थेट संघर्षाऐवजी याचा राजकीय वाटचालीत कसा फायदा होईल, याचाही विचार करताना दिसतायेत. Rohit Pawar
‘राष्ट्रवादीतली फूट रोहित पवारांसाठी संधी’
“रोहित पवारांनी विचार करून हा निर्णय घेतलेला दिसतो. ते स्वत:ला ‘लंबी रेस का घोडा’ मानतात. आता ते अजित पवारांसोबत गेले असते, तर सत्तेत गेलेल्या इतर आमदारांपैकी एक आमदार एवढीच त्यांची ओळख उरली असती. पण आता ते शरद पवार गटातील महत्त्वाचे नेते बनलेत. रोहित पवारांना आता सत्ता तात्पुरती मिळाली असती. पण हा संघर्ष त्यांना आज ना उद्या करावाच लागला असता. हा त्यांना संघर्ष चुकणार नव्हता.”
“यशवंतराव चव्हाण, शरद पवार हा वारसा पुढे न्यायचा असेल, तर भाजपसोबत जाऊन चालणार नाही, हे रोहित पवारांना कळलंय. खरंतर रोहित पवार स्वत: उद्योजकही आहेत. उद्योग सांभाळायचे म्हणजे सत्तेचं पाठबळ लागतं. मात्र, तरीही त्यांनी धोका पत्कारला आहे, याचा अर्थ ते तात्पुरत्या फायद्यावर लक्ष ठेवून नाहीत. ते दूरचा विचार करताना दिसतायेत.”
“राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे रोहित पवारांना नेतृत्त्व तयार करण्यासाठी संधी मिळालीय. आधी महाराष्ट्रभर फिरून पक्षाचं नेतृत्त्व म्हणून पुढे आणण्यास मर्यादा होत्या. आताचं पक्षावरील हे संकट खरंतर रोहित पवारांसाठी संधी आहे.”