औषध घोटाळ्यातील स्टोअर किपर सोळंकी यांना बडतर्फ करा

Sack store keeper drug scam

सोलापूर : प्रतिनिधी

जि. प. आरोग्य विभागातील फार्मासिस्ट प्रविण सोळंकी यांनी स्टोअर किपर असताना वारंवार घोटाळे केले आहेत. त्यांच्याकडून औषधे जाळणे, एक्सपाईरी औषधे खरेदी करणे, वरिष्ठांच्या नावे टक्केवारी घेणे, वारंवार स्टोअर किपर म्हणून नेमणूक करून घेणे असे प्रकार वारंवार घडले आहेत. कित्येक औषध खरेदीत त्यांना वसुली लागली आहे. त्यामुळे वादग्रस्त आणि औषध घोटाळ्यातील स्टोअर किपर प्रविण सोळंकी यांना चौकशीअंती बडतर्फ करा, अशी मागणी व तक्रारी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे प्रभुलिंग बिराजदार यांनी लेखी निवेदनाव्दारे बुधवारी केली आहे.

तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, फार्मासिस्ट सोळंकी हे गेल्या 10 वर्षांपासून किमान 5 वेळा स्टोअर किपर म्हणून कार्यरत राहिले आहेत. त्यांना नेमूण दिलेल्या औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम न करता ते वारंवार स्टोअर किपर म्हणून कामकाज पाहतात. गेल्या 10 वर्षात त्यांचे व औषध पुरवठा करणाऱ्या कंपन्या व कंपन्यांचे पुरवठादार यांचे हितसंबंध तयार झाले आहेत. त्यामुळे सोळंकी यांच्याकडून मर्जीतील कंपन्यांकडून औषध खरेदी करणे, वारंवार त्याच त्या कंपन्यांना ऑर्डर देणे, मर्जीतील औषध कंपन्यांकडून एक्सपाईरी औषधांची खरेदी करणे, स्टॉकबुकला खोट्या नोंदी घेणे असे प्रकार घडले आहेत. याविरोधात जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे तत्कालीन आरोग्य सभापाती आणि सदस्यांच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. असे असताना पुन्हा स्टोअर किपर म्हणून सोळंकी कार्यरत आहेत.

आरोग्य विभागात 60 हून अधिक फार्मासिस्ट असताना वारंवार प्रविण सोळंकी यांच्याकडे स्टोअर किपर पदाचा पदभार का दिला जात आहे ? सोळंकी यांच्याकडूनही या पदासाठी वारंवार प्रयत्न का केले जात आहेत ? याबाबत जिल्हा परिषद आरोग्य विभागात चर्चा होत आहे. त्यामुळे स्टोअर किपर पदाचा पदभार जेष्ठतेनुसार द्यावा.

सोळंकी हे औषधी व सामग्रीचे टेंडर तयार करताना ठराविक पुरवठादार यांनाच टेंडर भरता येईल अशा प्रकारे अटी व शर्ती टाकूनच टेंडर तयार करतात. सोळंकी यांचे  नातेवाईक हे औषध बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये आहेत. त्यामुळे त्यांची औषधे व वैद्यकीय सामग्री विक्रेते यांच्यासोबत स्नेहपूर्न संबंध आहेत.

पंढरपूर यात्रा काळात तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. जाधव यांच्या मर्जी नुसार तीन-तीन लाखाचे तुकडे पाडून दर करार पद्धतीने सोयीच्या पुरवठादाराकडून औषधे खरेदी केली आहेत. त्यामुळे याबाबत प्रविण सोळंकी यांनी केलेल्या गैर व्यवहाराची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी.

श्री. भारत शिंदे माजी जिल्हा परिषद सदस्य यांनी सोलापूर जिल्हा औषध भांडार येथील मुदतबाह्य औषधी साठा जाळून निरलेखित केलेबाबत चौकशी करणेसाठी निवेदन दिले आहे. याबाबत प्रविण सोळंकी यांची चौकशी करण्यात यावी.

जिल्हा औषध भांडार येथून वितरीत करण्यात आलेल्या सर्व औषधी व सामग्री या खरोखरच प्रा. आ. केंद्र येथे पोहचल्या आहेत की नाही ? याची चौकशी करण्यात यावी. अनेक औषधी व सामग्री यांचे खोटे व्हाउचर तयार करून ती औषध सामग्री वितरीत केल्याचे दाखवले जाते. प्रत्यक्षात कोणतीही खरेदी न करता बोगस पावत्याद्वारे लाखो रुपयांची औषधी व सामग्री खरेदी केल्याचे दाखवून त्याच्या खोट्या नोंदी घेतल्या जातात. प्रा. आ. केंद्राकडून कोणतीही मागणी नसताना खोट्या email द्वारे मागणी तयार करून त्यानुसार खरेदी केली जाते. त्यांच्या यापूर्वी आलेल्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करावी. चौकशी दरम्यान भ्रष्टाचारी प्रविण सोळंकी यांच्याकडून स्टोअर किपर पद काढून घ्यावे. जेणेकरून ते चौकशी पारदर्शक होईल आणि ते कोणत्याही कागदपत्रांची फेरफार करू शकणार नाहीत. ज्यामुळे शासनाची देखील कोट्यावधी रूपयांची बचत होईल. तसेच चौकशीअंती सोळंकी यांना बडतर्फ करावे, अशी लेखी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्याकडे बुधवारी प्रभुलिंग बिराजदार यांनी केली.

मुळ नियुक्ती प्रा. आ. केंद्र औराद अन कामकाज स्टोअरमध्ये

– जिल्हा औषध भांडार येथील औषध निर्माता (स्टोअर किपर) या पदावर काम करण्यास अनेक औषध निर्माता तयार आहेत. परंतु या पदावर प्रतिनियुक्तीवर प्रविण सोळंकी यांना नेमलेले आहे. गेले अनेक वर्ष सोळंकी हे अदलून बदलून येथेच कार्यरत आहे. याबाबत सदरचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून टिपनी ठेवून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने प्रतिनियुक्ती करण्यात आलेली आहे. असे करताना कोठेही मा. विभागीय आयुक्त तथा शासनाकडे परवानगी मागण्यात आलेली नाही. या प्रकारे वर्षानुवर्ष बेकायदा प्रतीनियुक्तीवर कामकाज सुरू आहे. प्रविण सोळंकी यांची मुळ नियुक्ती औराद प्राथमिक आरोग्य केंद्रात आहे. असे असताना बेकायदेशीरपणे सध्याही औषध भांडारमध्ये ते कार्यरत आहेत. यामुळे औराद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांना सेवा मिळत नाही. प्रा. आ. केंद्र औराद येथील औषधीसाठा याची पडताळणी केली जात नाही. तेथील औषध साठा हा कसाबसा जुळवला जातो.

सोळंकी यांच्याकडून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे पाचशे रूपयांची मागणी

-सध्याचे औषध भांडार हे NHM च्या इमारतीत आहे. येथे NHM चे काही कंत्राटी कर्मचारी नियमित कामकाजासाठी बसतात. त्यामुळे येथे बसणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी महिन्याला पाचशे रूपये देण्याची मागणी सोळंकी यांनी केली आहे. यामुळे सव्वा ते दिड लाख पगार असणाऱ्या सोळंकी यांनी 12 ते 15 हजार पगार असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे पाचशे रूपये मागितली असल्याची चर्चा संपूर्ण जिल्हा परिषद आणि आरोग्य विभागात रंगली आहे.

 

हेही वाचा :

– औषध खरेदी प्रक्रीयेचे टेंडर रद्द करा, अन्यथा आरोग्य मंत्र्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार

– आरोग्य मंत्र्यांच्या बंधूंची “आरोग्य विभागात लुडबुड”

– 25 वर्षे एकाच जिल्ह्यात असलेल्या डॉ. पिंपळेंची जिल्हाबाह्य बदली करा

– आरोग्य मंत्र्यांचा आदेश झुगारून रफिक शेख मुख्यालयातच

– कंत्राटी सेवेतुन कार्यमुक्त केलेल्या नागेश चौधरींना त्वरीत सेवेतून कमी करा

– उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या पत्राला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून केराची टोपली

– लेखी आदेश देऊनही NHM आयुक्त धीरज कुमार यांच्या पत्राला केराची टोपली

– राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मनुष्यबळ भरतीस टाळाटाळ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *