Sanjay Raut On Nitin Desai : काही दिवसांपूर्वी सनी देओल यांच्या बंगल्याचा लिलाव होणार असे समोर आले, मात्र २४ तासात बँकेने हा निर्णय रद्द केला; याच मुद्द्यावरुन Sanjay Raut यांनी भाजपवर टीका केली आहे.
नितीन देसाईंविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, ‘मात्र २४ तासात तुम्ही लिलाव थांबवला, दिल्लीतून संदेश आला. त्यांचे घर आणि त्यांनाही वाचवले. मात्र आमचे नितीन देसाई त्यांचा स्टुडिओ वाचवण्यासाठी दारोदार भटकत होते. त्यांनीही कर्ज चुकवायचे होते. त्या घटनेच्या दोन दिवस आधी ते दिल्लीला गेले होते. भाजप नेते आणि मंत्र्यांची त्यांनी भेट घेतली. मात्र त्यांना कोणताही दिलासा दिला गेला नाही. नितीन देसाईंचा स्टुडिओही वाचवला नाही आणि त्यांचा जीवही वाचवला नाही.’ दिल्लीतून सूत्र हलवल्यानंतर २४ तासात सनी यांचा बंगला वाचवण्यात आला, मग हाच न्याय नितीन देसाईंना का नाही? असा सवाल यावेळी Sanjay Raut यांनी उपस्थित केला.
Sanjay Raut यांनी या पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली की, नितीन देसाई यांनी दिल्लीत जाऊन काही महत्त्वाच्या भाजप नेत्यांची भेट घेतली होती. त्यांनी कोणाचेही नाव यावेळी घेतले नाही. राऊत यांनी असेही सांगितले की यावेळी नितीन देसाईंच्या डोळ्यात पाणी होते, या नेत्यांना त्यांनी असे म्हटलेले की- माझं स्वप्न वाचवा. ‘भाजपचे खासदार, स्टार प्रचारक असणाऱ्या सनी देओल यांना एक न्याय आणि आमच्या नितीन देसाईंना एक न्याय, असं का? तुम्ही देसाईंना मरू दिलं, त्यांच्या स्टुडिओचा लिलाव होऊ देताय’, असा आरोप यावेळी त्यांनी केला.
संजय राऊत यांनी असाही आरोप केला की, जे भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत, त्यांची कोट्यवधींची कर्ज माफ केली जातात. मात्र देसाईंच्या बाबतीत असा कोणताही निर्णय घेतला नाही. त्यांनी असे म्हटले की, ‘देसाईंना यांना मरू दिले, त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले गेले. सध्या देशात हेच सुरू आहे.’
Sanjay Raut
काय आहे सनी देओल यांच्या बंगल्याचे प्रकरण?
२० ऑगस्ट २०२३ रोजी बँक ऑफ बडोदाने नोटीस जारी करत असे म्हटले होते की, ५६ कोटींचे कर्ज न भरल्याने २५ सप्टेंबर रोजी सनी देओल यांचा जुहू याठिकाणी असणाऱ्या ‘सनी व्हिला’ या बंगल्याचा लिलाव केला जाईल. मात्र लगेचच २१ ऑगस्ट रोजी वृत्तपत्रांमध्ये दिलेल्या जाहिरातीत बँक ऑफ बडोदाने स्पष्टपणे लिहिले आहे की, सनीच्या ज्या बंगल्याचा लिलाव होणार होता, त्यासंदर्भातील नोटीस त्यांनी तांत्रिक कारणांमुळे मागे घेतली आहे आणि सदरचा लिलाव सध्या तरी थांबवला आहे.