Senior BSP leader Rahul Sarvade death of heart attack
बहुजन समाज पक्षाचे वरिष्ठ नेते राहुल सरवदे यांचे हृदयविकाराने निधन; आंबेडकरी चळवळीतील योद्धा काळाच्या पडद्याआड
सोलापूर दिनांक 29 [Sachinkumar Jadhav]
बहुजन समाज पक्षाचे देशातील वरिष्ठ नेते राहुल सरवदे यांचे वयाच्या 65 व्या वर्षी बुधवारी 29 मे रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी बुधवारी सायंकाळी 6 वाजता पुना नाका येथील स्मशानभूमीत होणार असून त्यांचे निवासस्थान मिलिंद नगर बुधवार पेठ येथून सायंकाळी पाच वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पाठीमागे पत्नी दोन मुले एक लग्न झालेली मुलगी असा परिवार आहे.
राहुल सर्वदे यांना गेल्या दोन-तीन महिन्यापासून हृदयविकाराचा त्रास जाणवत होतो यापूर्वीही त्यांच्यावर हृदयविकाराबाबत उपचार झालेत. परंतु त्रास जास्त जाणू लागल्यानं त्यांना काही दिवसांपूर्वी शहरातील श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान बुधवारी सकाळी साधारण आठच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला
राहुल सरवदे हे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे युवकांचे मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच बहुजन समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या अकाली निधनाने सोलापुरातील आंबेडकरी चळवळीतील न भरून येणार नुकसान झाला आहे.
एक पक्ष ,एक नेता, एक झेंडा अशी मृत्यूच्या शेवटच्या घटकापर्यंत बहुजन समाज पक्षाशी एकनिष्ठ असणारे कालकथित राहुल सरवदे यांच्या अकस्मित निधनाने. राज्यातील बहुजन समाजामध्ये शुककाळ पसरला आहे. तरुण वयातच बहुजन समाज पक्षाचा कार्यकर्ता म्हणून पक्षाच्या स्थापनेपासून त्यांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन राहुल सरवदे राजकारण व समाजकार्यात सक्रिय होते. सामान्य कार्यकर्ता ते राष्ट्रीय नेते इथपर्यंत त्यांचा प्रवास उल्लेखनीय आहे.
राजकीय कारगिल……
राहुल सर्वदे यांनी आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्याचे प्रभारी म्हणून काम केलं आहेत. कर्नाटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत प्रभारी म्हणून काम करत असताना त्यांच्या कारकिर्दीत दोन आमदार निवडून आणले होते. सोलापूर महानगरपालिकेत एक नगरसेवकापासून ते चार नगरसेवक निवडून आणण्यापर्यंत त्यांनी प्रयत्न होते. सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी पक्षाचे तिकीट देऊन निवडून आणलं शिवाय त्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी सोलापुरातील नेता म्हणून ओळख मिळवून दिली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल सर्वदे हे बहुजन समाज पक्षाचे सोलापुरातील उमेदवार होते. परंतु वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर हे सोलापुरातून लोकसभेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यामुळे राहुल सर्वदे यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आणि प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा दिला होता.
सोलापुरातील मध्यवर्ती आंबेडकर जयंतीच्या बैठकीमध्ये ते प्रामुख्याने पुढाकार घेत होते. पोलीस आयुक्तालयातील बैठक असो वा शांतता कमिटीची बैठक ते निर्भीडपणे समाजाची बाजू मांडत असत.
स्वाभिमानी आंबेडकरी नेता म्हणून आजही त्यांची ओळख कायम आहे.
राहुल सरवदे यांच्या अंत्ययात्रेत बहुजन समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष परमेश्वर गोणारे सहभागी होणार असल्याचं त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितलं आहे.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अभिवादन
🙏🏻🙏🏻🙏🏻
अभिवादक :- Sachinkumar Jadhav
संपादक:- दैनिक लोकसंवाद