The Azadi Ka Amrit Mahotsav | मेरी माटी मेरा देश अभियान

The Azadi Ka Amrit Mahotsav | मेरी माटी मेरा देश अभियान
The Azadi Ka Amrit Mahotsav | मेरी माटी मेरा देश अभियान

The Azadi Ka Amrit Mahotsav | मेरी माटी मेरा देश अभियान

माझी माती माझा देश अभियानांतर्गत जिल्हास्तरावर सर्व अमृत कलशाचे पूजन

सोलापूर, दिनांक 21 :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान सुरू आहे. मिट्टी को नमन वीरो को वंदन या घोषवाक्यसह या अभियानाची सुरुवात झाली.
या अभियानाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. देशासाठी बलिदान दिलेले शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी या अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका प्रशासनच्या वतीने महानगरपालिकेच्या आयुक्त मा.शीतल तेली- उगले,जिल्हाधिकारी मा.कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज सोलापूर महानगरपालिकेच्या कॅम्प प्रशालेमध्ये अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

पंचायत समितीच्या अकरा, महापालिकेचा एक व जिल्हा प्रशासनाचा एक अशा 13 अमृत कलशाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन

या अमृत कलश मध्ये सोलापूर महानगरपालिकेचे एक कलश, सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद /पंचायत समितीचे 11 कलश, जिल्हा प्रशासनाच्या वतीने एक कलश आणण्यात आले होते. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, आशिष लोकरे व मान्यवाराच्या हस्ते कलशाचे पूजन करण्यात आले.
त्यानंतर उपस्थित असलेले सर्व मान्यवर व विद्यार्थी यांनी पंचप्राण शपथ घेण्यात आले. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे कॅम्प व इतर मनपाच्या प्रशाला च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमामध्ये नृत्य , समुह नृत्य , वादन चर्चासत्रे , व्याख्याने व देशभक्तीपर गीतांचा सादरीकरण करण्यात आले.. त्यानंतर सर्व कलश नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवका मार्फत 27 ऑक्टोबर 2023 रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री व मा.सांस्कृतिक कार्य यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईला पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर अंतिम सोहळा 1 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शालेय विद्यार्थ्याकडून देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण

शालेय विद्यार्थी
शालेय विद्यार्थी

या कार्यक्रमास सोलापूर शहरातील तेरा कलश नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक या सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमास सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, माजी सैनिक महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष अरुण कुमार तळीखेडे, दिवाकर रळेकर, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी अजित कुमार, माळशिरसचे मुख्याधिकारी नितीन गाढवे, श्रीपुर नगरपंचायत चे मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, माढाचे मुख्य अधिकारी पूजा दुधनाळे, वैराग चे मुख्य अधिकारी विद्या पाटील, ग्रामविकास अधिकारी वैभव आहाळे, गटविकास अधिकारी महेश पाटील, भारतीय माजी सैनिक संघटना संचालक रणजीत निमंग्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *