To get employment for unemployed women | रोजगार मेळाव्यात 1100 पद
मंगळवारी बेरोजगार महिला उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
सोलापूर व पुणे येथील उद्योजकांकडून 1100 पदांची मागणी
To get employment for unemployed women | रोजगार मेळावा 1100 पद
सोलापूर दि.22 –
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर आणि ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार महिला उमेदवारांसाठी मंगळवार, दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय महिला रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील नोकरीइच्छुक महिला उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टिने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
To get employment for unemployed women | रोजगार मेळावा 1100 पद या रोजगार मेळाव्यात 10 वी, 12 वी, आय. टी. आय डिप्लोमा, ग्रॅज्युएट, कोणतीही पदवी, इलेक्ट्रीशीयन, नर्सिंग, बी.कॉम, अशा प्रकारची एकुण 1100 पेक्षा जास्त रिक्तपदे सोलापूर आणि पुणे येथिल उद्योजकांनी अधिसुचीत केलेली आहेत.
नोकरी इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या कागदपत्रासह मंगळवार, दिनांक 26 सप्टेंबर 2023 रोजी ठीक 10 वा. “ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, रविवार पेठ, राजेंद्र चौक, सोलापूर” येथे मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
To get employment for unemployed women | रोजगार मेळावा 1100 पद
याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 0217-2950956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सोलापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त एच.एस. नलावडे यांनी केले आहे.
To get employment for unemployed women | रोजगार मेळावा
1100 पद
Check Also
oppose to the office of Deputy Registrar | सत्ताधारी पक्षातील दोन नेते समोरासमोर