Tomatoes Nutritional profile : गेल्या काही महिन्यांपासून टोमॅटोचे भाव गगनाला भिडले होते. उत्पादन कमी झाल्यामुळे टोमॅटो चक्क १५० ते २०० रुपये किलोनी विकले गेले. त्यामुळे अनेकांनी टोमॅटोचा वापर काटकसरीने केला; पण आता मात्र टोमॅटोचे भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे न्यूट्रिशनचे पॉवरहाऊस असणारा टोमॅटो तुम्ही आता बिनधास्त खाऊ शकता.
मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ व न्यूट्रिशनिस्ट डॉ. उषाकिरण सिसोदिया सांगतात, “टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फोलेट व व्हिटॅमिन के चे प्रमाण चांगले असते. त्याशिवाय यात व्हिटॅमिन ई, थायामिन, नियासिन, व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, फॉस्फरस व तांब्याचाही समावेश असतो. Tomatoes
मात्र, पावसाळ्यात टोमॅटो खाताना काळजी घेणे गरजेचे आहे. टोमॅटो चांगले धुऊन खावेत आणि शक्य असेल, तर कीटकनाशकांचा प्रभाव दूर ठेवण्यासाठी ऑरगॅनिक पद्धतीने पिकवलेल्या टोमॅटोचा वापर करावा. Tomatoes
१०० ग्रॅम टोमॅटोमध्ये कोणते पौष्टिक घटक असतात याविषयी सिसोदिया खालीलप्रमाणे सांगतात :
कॅलरी- २२ कॅलरीज
कर्बोदके- ४.८ ग्रॅम
साखर- ३.२ ग्रॅम
प्रोटिन्स- १.१ ग्रॅम
फॅट- ०.२ ग्रॅम
फायबर – १.५ ग्रॅम
टोमॅटो आरोग्यासाठी फायदेशीर Tomatoes
डॉ. सिसोदिया यांनी टोमॅटोचे फायदे सांगितले आहेत. ते जाणून घेऊ या.
हृदयाचे आरोग्य सुधारणे –
LDL (Low-Density Lipoprotein) कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब कमी करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहे.
कर्करोगाचा धोका कमी करणे- Tomatoes
टोमॅटोच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका कमी करता येऊ शकतो. विशेषत: टोमॅटोमध्ये अतिप्रमाणात असलेल्या लाइकोपेनमुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका टाळता येतो.
पचनक्रिया आणि डोळ्यांचे आरोग्य – Tomatoes
टोमॅटोमध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि टोमॅटोमधील बीटा कॅरोटीन आणि ल्युटिन आपल्या डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
भरपूर व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स-
मधुमेह असणारे लोक टोमॅटो खाऊ शकतात का?
सिसोदिया सांगतात, “टोमॅटोमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. त्यामुळे मधुमेह असणारे लोकही टोमॅटो खाऊ शकतात.”
गर्भवती महिलांनी टोमॅटो खावेत का?
डॉ. सिसोदिया पुढे सांगतात, “टोमॅटोमध्ये फोलेटचे प्रमाण अधिक असते. फोलेट हे बाळाच्या न्यूरल ट्युबच्या विकासासाठी चांगले असते. न्यूरल ट्युब म्हणजे गर्भामध्ये एक नळी तयार होते. टोमॅटोमध्ये असलेले पोषक घटक आई आणि बाळ या दोघांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
टोमॅटो खाण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे
- काही लोकांना टोमॅटोची ॲलर्जी असू शकते. त्यामुळे त्वचेशी संबंधीत आजार किंवा पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो.
- टोमॅटोमधील सायट्रिक ॲसिडमुळे बिघडू शकते पोट
- टोमॅटोचे चुकूनही अतिसेवन करू नये. त्यामुळे पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो.
टोमॅटोविषयी लोकांचे अनेक गैरसमज आहे. त्याविषयी बोलताना सिसोदिया सांगतात- “टोमॅटोमध्ये कॅलरीज आणि फॅटस् कमी असतात. शिजवलेल्या टोमॅटोपेक्षा कच्चे टोमॅटो जास्त पौष्टिक असतात. परंतु, टोमॅटोमुळे किडनी स्टोन होतो, इत्यादींसारखे अनेक गैरसमज आहेत; जे दूर करणे गरजेचे आहे