Voting awareness प्रभात फेरीच्या माध्यमांतून मतदार जनजागृती

मतदान जनजागृती
मतदान जनजागृती

 

 

Voting awareness प्रभात फेरीच्या माध्यमांतून मतदार जनजागृती

सोलापूर दि.26 : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा व नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा अधिकार बजाविण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर, दयानंद शिक्षणशास्त्र, कला व शास्त्र, विधी महाविद्यालय, डी. ए. व्ही. वेलणकर महाविद्यालय, रोटरी क्लब ऑफ प्राईड सोलापूर आणि डब्ल्यू.ई फॉऊंडेशन, पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या रॅलीचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. लोकशाहीला बळकट करण्यासाठी प्रत्येकांनी मतदान करणे आवश्यक आहे. थेंबे थेंबे तळे साचे या उक्ती प्रमाणे मतदान स्वतः पासून सुरुवात करत सर्वांना देशहिताच्या कार्यांत सहभागीं करून घेण्यासाठी महाविद्यालयांचे व विद्यार्थ्यांचे खुप मोठे योगदान असुन हे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडत असल्याचा आनंद कुलगुरु प्रकाश महानवर यांनी प्रभात फेरीच्या उद्घाटनप्रसंगी काढले. तसेच कुलगुरू महानवर यांनी विद्यार्थी राष्ट्रीय कामात सक्रिय भूमिका बजावत असल्यामुळे त्यांचे कौतुक केले.    या रॅलीसाठी कुलगुरू समवेत सोलापूर विद्यापीठाचे एनएसएस विभागाचे प्रमुख व विद्यापीठाचे संचालक राजेंद्र वडणे , तहसीलदार तथा अतिरिक्त निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती ओसवाल, श्रीमती भावसार व डब्ल्यू.ई फॉऊंडेशन चे जिल्हा समन्वयक सोमनाथ पवार हे उपस्थित होते.

 

मतदान जनजागृती मोहीम
मतदान जनजागृती मोहीम

दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य व प्रशासक डॉ. व्ही. पी. उबाळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य डॉ. एस. बी. क्षीरसागर प्र. प्राचार्य डॉ. एस. व्ही. शिंदे, प्र. प्राचार्य डॉ. एस. जी. गायकवाड आणि रोटरी क्लबचे रोटे. चव्हाण व रोट. उपाध्ये, रोट. उदगिरी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या नोडल ऑफिसर डॉ. एल. व्ही. बामणे व इएलसी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते. तसेच कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक व कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

रॅलीनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम घेण्यात आला. मतदान जागृतीसाठी विविध स्पर्धामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना तहसीलदार श्रीमती ओसवाल मॅडमच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले

मतदान जनजागृती मोहीम
मतदान जनजागृती मोहीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *